• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • On This Day : न्यूझीलंडचा पराभव न होताच इंग्लंडने जिंकला वर्ल्ड कप

On This Day : न्यूझीलंडचा पराभव न होताच इंग्लंडने जिंकला वर्ल्ड कप

आजच्याच दिवशी (On This Day) दोन वर्षांपूर्वी झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव न करता इंग्लंडने (England vs New Zealand) विजेतेपद पटकावले होते.

 • Share this:
  मुंबई, 14 जुलै : क्रिकेट इति्हासाताील वादग्रस्त सामन्यांमध्ये 2019 च्या वर्ल्ड कप फायनलचा (World Cup 2019 Final) वरचा क्रमांक आहे. आजच्याच दिवशी (On This Day) दोन वर्षांपूर्वी झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव न करता इंग्लंडने  (England vs New Zealand) विजेतेपद पटकावले होते. या विजतेपदाने इंग्लंडची स्वप्नपूर्ती झाली. मात्र वादग्रस्त नियमांमुळे मॅच न हरताही वर्ल्ड कप न जिंकल्याचा त्रास न्यूझीलंडच्या फॅन्सना सहन करावा लागला. मॅचमध्ये काय झालं? वर्ल्ड कप फायनलमध्ये न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग घेतली. हेन्री निकोलसचं अर्धशतक आणि टॉम लॅथमचे 47 रन याच्या मदतीनं न्यूझीलंडनं 50 ओव्हर्समध्ये 8 आऊट 241 रन केले. त्याला उत्तर देताना इंग्लंडची अवस्था 4 आऊट 86 झाली होती. त्यावेळी जोस बटलर (Jos Buttler) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) यांनी महत्त्वाची पार्टनरशिप करत इंग्लंडला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. त्यानंतर फर्ग्युसन आणि जिमी नीशम यांच्या बॉलिंगमुळे न्यूझीलंडनं कमबॅक केले. मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये इंग्लंडला विजयासाठी 15 रनची आवश्यकता होती. ट्रेंट बोल्टच्या बॉलिंगवर बेन स्टोक्स स्ट्राईकवर होता. त्या ओव्हरमधील पहिल्या दोन बॉलवर स्टोक्सनं एकही रन काढला नाही. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर स्टोक्सनं सिक्स लगावला. चौथ्या बॉल बेन स्टोक्सनं मिडविकेटच्या दिशेनं टोलावला. त्यानंतर तो दोन रन काढण्यासाठी पळाला. त्यावेळी न्यूझीलंडच्या मार्टीन गप्टीलनं ओव्हर थ्रो केल्यानं इंग्लंडला 4 अतिरिक्त रन मिळाले. त्यामुळे इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 2 बॉलमध्ये फक्त 3 रनची गरज होती. त्यानंतरच्या दोन बॉलवर इंग्लंडचे दोन खेळाडू रन आऊट झाले. इंग्लंडला फक्त दोन रन करता आल्यानं मॅच टाय झाली आणि वर्ल्ड कप फायनलच्या इतिहासात पहिल्यांदाच सुपर ओव्हरमध्ये मॅचचा निकाल लागणार होता. सुपर ओव्हरचा थरार सुपर ओव्हरमध्ये जो थरार झाला त्याबद्दल फॅन्सनं कधी विचारही केला नसेल. इंग्लंडकडूम पुन्हा एकदा जोस बटलर आणि स्टोक्स मैदानात उतरले.  न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टनं ती ओव्हर टाकली. इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये 15 रन काढले. त्यानंतर  न्यूझीलंडकडून जिमी निशम आणि मार्टीन गप्टील बॅटींगला आले. नीशमनं आर्चरच्या बॉलिंगवर फटकेबाजी करत न्यूझीलंडचं आव्हान जिवंत ठेवलं. शेवटच्या बॉलवर न्यूझीलंडला विजयासाठी दोन रन हवे होते. त्यावेळी एक रन झाल्यानंतर दुसरा रन काढण्याच्या नादात गप्टील रन आऊट झाला. सुपर ओव्हरमध्येही मॅच टाय झाली. ENG vs PAK: इंग्लंडच्या B टीमकडून पाकिस्तानला क्लीन स्वीप, बाबर आझमचं शतक व्यर्थ सुपर ओव्हरमध्येही मॅच टाय झाल्यानंतर आयसीसीच्या नियमाच्या आधारावर जास्त बाऊंड्री मारणाऱ्या टीमला विजयी घोषित करण्यात आले. न्यूझीलंडने 2 सिक्स आणि 14 फोर लगावले होते. तर इंग्लंडने 2 सिक्स आणि 22 फोर लगावले. त्यामुळे बाऊंड्रीच्या नियमावर इंग्लंडनं विश्वविजेतेपद पटकाले.
  Published by:News18 Desk
  First published: