मुंबई, 14 जून : टेस्ट क्रिकेटमधील संथ खेळ पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकांना पुन्हा क्रिकेटकडं वळवण्यासाठी वन-डे क्रिकेटला सुरुवात झाली. मात्र वन-डे क्रिकेटमध्येही काही वेळा टीमनं संथ खेळ करत लाजिरवाणे रेकॉर्ड केले आहेत. 14 जूनला म्हणजेच आजच्या दिवशी 1979 साली एका लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद क्रिकेट इतिहासात झाली आहे.
क्रिकेट वर्ल्ड कप 1979 मध्ये इंग्लंड विरुद्ध कॅनडा (England vs Canada) यांच्यात झालेल्या मॅचमध्ये हा रेकॉर्ड झाला. या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटींग करणारी कॅनडाची टीम फक्त 45 रनवर ऑल आऊट झाली. मात्र हे 45 रन करण्यासाठी त्यांनी तब्बल 40.3 ओव्हर्स म्हणजे 243 बॉल बॅटींग केली.
1979 च्या वर्ल्ड कपमधील 8 वी मॅच इंग्लंड विरुद्ध कॅनडामध्ये होती. तेव्हा वन-डे क्रिकेट 60 ओव्हर्सचे होते. कॅनडाचा कॅप्टन ब्रायन मॉरिसेट याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या अचूक बॉलिंपुढे कॅनडाचे सर्वच बॅट्समन फेल गेले.
सुशांत सिंह राजपूतकडून क्रिकेट शिकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची 'ती' इच्छा अपूर्ण
कॅनडाच्या तीन बॅट्समन्सना खातंही उघडता आलं नाही. फ्रँकलिन डेनिस या एकमेव बॅट्समननं 21 रन काढत दोन अंकी धावसंख्या केली. मात्र हे 21 रन काढण्यासाठी त्यानं 99 बॉल बॅटींग केली. इंग्लंडकडून ख्रिस ओल्डनं 8 रनमध्ये 4 विकेट्स घेतल्या. इंग्लंनं 46 रनचं माफक आव्हन 13.5 ओव्हर्समध्ये 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. ख्रिस ओल्ड ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराचा मानकरी ठरला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, On this Day