मी काही रोबोट नाही, वाटलं तर माझी कातडी काढून बघा-विराट कोहली

मी काही रोबोट नाही, वाटलं तर माझी कातडी काढून बघा-विराट कोहली

भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांतीचा सल्ला दिला जात आहे.

  • Share this:

15 नोव्हेंबर : भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांतीचा सल्ला दिला जात आहे. मात्र, मी काही रोबोट नाहीये, वाटलं तर माझी कातडी काढून बघा अशा शब्दात विराट कोहलीने फटकारलं.

श्रीलंकेविरुद्ध गुरुवारपासून कसोटी सिरीज सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत भारत आणि श्रीलंकेदरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त सामने खेळवण्यात आले. याबद्दल पत्रकार परिषदेत विराट कोहलीला विचारले असता, याचा निर्णय प्रेक्षकच घेतील ते बरं ठरेल असं उत्तर दिलं. तसंच जास्त क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना विश्रांतीची गरज आहे. विशेष म्हणजे विराटचं हे उत्तर हार्दिक पंड्याला या कसोटी सिरीजमध्ये दिलेल्या विश्रांतीवर आहे.

तसंच प्रत्येक खेळाडूंना विश्रांतीची गरज असते. मलाही विश्रांतीची गरज असते. माझ्या शरीराला जेव्हा विश्रांतीची गरज असेल, तेव्हा विश्रांती घ्यावीच लागेल. मी काही रोबोट नाही. माझं कातडं कापून तुम्ही बघू शकता असं म्हणत आपल्याला विश्रांतीचा सल्ला देणाऱ्यांना विराटने सुनावलं.

या पत्रकार परिषदेत विराट कोहलीला श्रीलंका आणि भारतात खेळवण्यात येणाऱ्या सामन्यांचा खुलासा केला. लोकांनी क्रिकेट पाहणे सोडून देणे हे कुणालाही पचणार नाही. खेळाडूंना कायम खेळात गुंतवणे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक खेळाडूला समोर असलेल्या टीमविरोधात खेळावं लागतंय. पण प्रेक्षकांसमोर अनेक पर्याय आहेत असंही विराट म्हणाला.

विशेष म्हणजे, भारताने श्रीलंकेविरुद्ध 2015 मध्ये कसोटी सीरीज खेळली त्यानंतर 2016 मध्येही आपल्या होमग्राऊंडवर सामने खेळवण्यात आले. आता पुन्हा श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामने खेळवण्यात येणार आहे. भारतीय टीम 2018 मध्ये इंडिपेंडेंस कप टी 20 खेळण्यासाठी लंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.

First published: November 15, 2017, 6:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading