मुंबई, 8 सप्टेंबर : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) गोल्ड मेडल जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात सध्या जोरदार लढत सुरू आहे. ही लढत खेळाच्या मैदानावर नाही तर जाहिरातीच्या मैदानात सुरू आहे. नीरजनं टोकयो ऑलिम्पिकमध्ये 87.59 मीटर लांब भाला टाकत गोल्ड मेडल जिंकले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर नीरज क्रीडा विश्वातील नवा पोस्टर बॉय बनला आहे.
या गोल्ड मेडलनंतर नीरजवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. त्याचबरोबर जाहिरातीच्या विश्वातही नीरजची मागणी वाढली आहे. मीडिया रिपोर्टनुसार नीरजनं त्याच्या जाहिरातीची फिस दहापट वाढवली आहे. आता या क्षेत्रात त्याच्या बाबतीमध्ये फक्त विराट कोहली एकमेव भारतीय खेळाडू पुढे आहे.
या रिपोर्टनुसार टोकयो ऑलिम्पिकपूर्वी नीरज जाहिरातीच्या माध्यमातून वर्षाला 15 ते 25 लाख रूपये कमावत होता. आता त्याची फिस 10 पट अधिक वाढली आहे. नीरजपेक्षा फक्त विराटची जाहिरातीमध्ये फिस अधिक आहे.
IND vs ENG: बेन स्टोक्स T20 वर्ल्ड कप खेळणार का? इंग्लंडच्या कोचनं दिलं मोठं अपडेट
नीरज आता रोहित शर्मा, केएल राहुल यांच्यापेक्षा पुढे गेला आहे. ते जाहिरातीसाठी वार्षिक 50 लाख ते 1 कोटी फी घेतात. 'इकोनॉमिक्स टाईम्स'च्या वृत्तानुसार नीरजचं काम पाहण्याऱ्या कंपनीची सध्या लग्झरी ऑटो आणि कपड्याच्या ब्रँडशी चर्चा सुरू आहे. एकूण 5 ते 6 डीलबाबत त्याची चर्चा सुरू आहे. हा करार पुढील आठवड्यात फायनल होण्याची शक्यता आहे. पॅरीसमध्ये 2024 साली होणाऱ्या ऑलिम्पिकपर्यंतचे हे करार आहेत, अशी माहिती नीरजचं व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुस्तफा घोष यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.