Home /News /sport /

NZ v WI : केन विल्यमसनने द्विशतकासह केले ‘हे’ खास विक्रम!

NZ v WI : केन विल्यमसनने द्विशतकासह केले ‘हे’ खास विक्रम!

हॅमिल्टन (Hamilton) मध्ये सुरु असलेल्या न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज (NZ v WI) पहिल्या टेस्टमध्ये न्यूझीलंड भक्कम स्थितीमध्ये आहे. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन ( Kane Williamson) ने या टेस्टमध्ये द्विशतकासह अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

पुढे वाचा ...
    हॅमिल्टन, 4 डिसेंबर :  वेस्ट इंडिज (West Indies) ची टीम सध्या न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामध्ये यजमान न्यूझीलंडची टीम जबरदस्त फॉर्मात आहे. सुरुवातीला झालेली तीन टी 20 ( T20 ) सामन्यांची मालिका न्यूझीलंडने 2-0 अशी जिंकली. एक सामना पावसाने होऊ शकला नव्हता. त्यापाठोपाठ हॅमिल्टन (Hamilton) मध्ये सुरु असलेल्या पहिल्या टेस्टमध्ये न्यूझीलंड भक्कम स्थितीमध्ये आहे. केन विल्यमसन (Kane Williamson) चे द्विशतक (Double Century) हे न्यूझीलंडच्या पहिल्या डावाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. विल्यमसनला टी 20 सीरिजमध्ये विश्रांती देण्यात आली होती. या विश्रांतीनंतर फ्रेश होऊन परतलेल्या विल्यमसनने वेस्ट इंडिजच्या बॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला. त्याने तब्बल दहा तासांपेक्षा जास्त बॅटिंग करत 251 रन्स काढले. ही मॅरेथॉन खेळी करण्यासाठी विल्यमसनने 412 बॉल्सचा सामना केला. 34 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने त्याने ही खेळी केली. न्यूझीलंडची 1 आऊट 14 अशी खराब सुरुवात झाली असताना विल्यमसन मैदानात उतरला होता. त्याने टॉम लॅथमसह सुरुवातीला 154 रन्सची भागिदारी करत टीमला सावरले. तो पहिल्या दिवसाखेर 97 रनवर नाबाद होता. दुसऱ्या दिवशी त्याने पुढे खेळ सुरु करत आधी शतक आणि नंतर द्विशतक झळकावले. केन विल्यमसन अखेर 251 रन काढून जोसेफच्या बॉलिंगवर आऊट झाला. त्यापूर्वी त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली होती. विल्यमसनचे विक्रम विल्यमसनचं हे कर्णधार म्हणून टेस्ट क्रिकेटमधील 9 वे शतक आहे. त्याचबरोबर त्याने न्यूझीलंडचा कर्णधार म्हणून सर्वात जास्त शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम स्टीफन फ्लेमिंगच्या नावावर होता. फ्लेमिंगने कर्णधार म्हणून आठ शतकं झळकावली आहेत. विल्यमसनचे हे टेस्ट क्रिकेटमधील 22 वे शतक होते. न्यूझीलंडकडून सर्वाधिक टेस्ट शतक झळकाण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. या शतकानंतर त्याने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रॉस टेलवरील आघाडी तीनने वाढवली आहे. विल्यमसनचे हे तिसरे द्विशतक आहे. न्यूझीलंडकडून सर्वाधिक द्विशतक बनवण्याच्या यादीत तो आता स्टीफन फ्लेमिंग आणि रॉस टेलरसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडकडून सर्वाधिक द्विशतकांचा विक्रम ब्रँडन मॅकलमच्या नावावर असून त्याने चार द्विशतक केले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, New zealand

    पुढील बातम्या