हॅमिल्टन, 3 डिसेंबर : न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज (NZ Vs WI) यांच्यात गुरुवारी हॅमिल्टन (Hamiltion) मध्ये झालेली पहिली टेस्ट सुरु झाली. या मॅचच्या पूर्वी वेस्ट इंडिजमधून फास्ट बॉलर केमार रोचच्या (Kemar Roach) वडिलांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. या आघातानंतरही रोचने पहिली टेस्ट खेळण्याचा निर्णय घेतला.
कौटुंबिक आघातानंतरही कर्तव्याला प्राधान्य देण्याच्या रोचच्या निर्णयाला दोन्ही टीमच्या खेळाडूंनी सलाम केला. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) ने मॅच सुरु होण्यापूर्वी रोचची गळाभेट घेऊन त्याचे सांत्वन केले. यावेळी विल्यमसन चांगलाच भावूक झाला होता. रोच आणि विल्यमसनच्या गळाभेटीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दोन्ही टीमनी वाहिली श्रद्धांजली
केमार रोचच्या वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन्ही टीमच्या खेळाडूंनी टेस्टच्या पहिल्या दिवशी काळा बँड घातला होता. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानेही यावेळी एक वक्तव्य प्रसिद्ध करत रोच यांच्या वडिलांना आदरांजली वाहिली आहे. त्याचबरोबर या संकटाच्या प्रसंगी बोर्ड रोचच्या सोबत असल्याचं स्पष्ट केले.
CWI extends deepest condolences to Kemar Roach and his family on the passing of his father.
Both the #MenInMaroon and the @BLACKCAPS teams wore black armbands on the opening day of the 1st Test in his honour.
More here⬇️https://t.co/qG8GtiO7h4 pic.twitter.com/nIwjfl3vq7
— Windies Cricket (@windiescricket) December 3, 2020
रोचची वडिलांना मानवंदना!
हॅमिल्टन टेस्टच्या पहिल्या दिवशी रोचनं नेहमीप्रमाणेच जीव तोडून बॉलिंग केली. त्याने टॉन लॅथम आणि केन विल्यमसन यांची पार्टरनरशिप तोडली. रोचनं लॅथमला 86 रन्सवर आऊट केले. त्यानंतर रोचने जमिनिवर गुडघा टेकवत वडिलांना मानवंदना दिली.
(कमाल) केमार रोच!
केमार रोच हा वेस्ट इंडिजचा एक प्रमुख बॉलर आहे. वेस्ट इंडिजच्या टीमला अनिश्चिततचे शाप असला तरी रोचने नेहमीच टीमला स्थिरता देण्याचा प्रयत्न केला आहे. रोच 12 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. या काळात त्याने 59 टेस्टमध्ये 201 तर 92 वन-डे मध्ये 124 विकेट्स घेतल्या आहेत.