• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • T20 World Cup, ENG vs NZ: सेमी फायनलमध्ये धोनीची चर्चा, 'या' घटनेमुळे आठवला माही

T20 World Cup, ENG vs NZ: सेमी फायनलमध्ये धोनीची चर्चा, 'या' घटनेमुळे आठवला माही

टी20 वर्ल्ड कपमधील पहिल्या सेमी फायनलमध्ये (T20 World Cup Semi Final) न्यूझीलंडनं इंग्लंडवर 5 विकेट्सनं (NZ vs ENG T20 World Cup) विजय मिळवला. या मॅचमध्येही महेंद्रसिंह धोनीचीच (MS Dhoni) चर्चा होती.

  • Share this:
    मुंबई, 11 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमधील पहिल्या सेमी फायनलमध्ये (T20 World Cup Semi Final) न्यूझीलंडनं इंग्लंडवर 5 विकेट्सनं  (NZ vs ENG T20 World Cup) विजय मिळवला. या विजयाबरोबरच न्यूझीलंडनं 2019 साली वन-डे वर्ल्ड कप फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. न्यूझीलंडच्या विजयात डॅरेल मिचेलसह (Daryl Mitchell) जेम्स नीशम (James Neesham)चं महत्त्वाचं योगदान होतं. त्यानं 11 बॉलमध्ये 27 रनची खेळी करत मॅचचं पारडं न्यूझीलंडच्या बाजूनं झुकवलं. डॅरेल मिचेलनं (Darell Mitchell) 19 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर चौकार लगावत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्यावेळी न्यूझीलंडच्या संपूर्ण ड्रेसिंग रूममध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. काही खेळाडूंनी उडी मारत आनंद व्यक्त केला. तर काही जण एकमेकांची गळाभेट घेत होते. न्यूझीलंडच्या टीममध्ये आनंदाचं वातावरण असताना त्यांचा ऑल राऊंडर जेम्स नीशम (James Neesham) खूर्चीवर शांत बसला होता. त्याचा चेहरा स्थिर होता. त्यावरील हावभाव बदलले नाहीत. तसंच त्यानं कोणतंही सेलिब्रेशन केलं नाही. या ऐतिहासिक विजयानंतरही नीशमचा चेहरा शांत होता. 'फॉक्स स्पोर्ट्स' च्या वृत्तानुसार मॅच संपल्यानंतर न्यूझीलंडची संपूर्ण टीम ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष करण्यासाठी गेली. त्यावेळी देखील नीशम एकटाच डगआऊटमधील खूर्चीवर बराच काळ बसला होता. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत नीशम एकटाच बसला असून त्याच्या जवळपास न्यूझीलंडचा एकही खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफ दिसत नाही. न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरचा हा फोटो पाहून अनेकांना टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी आठवला आहे. त्यांनी नीशमची तुलना धोनीशी केली आहे. 'जीमी नीशम देखील धोनीसारखा आहे.' असं मत सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.' क्रिकेट फॅन्स असं म्हणत आहेत कारण, धोनी देखील मैदानात असाच शांत असतो. मॅचच्या निकालाचा त्याच्यावर फार परिणाम होत नाही. तो जिंकल्यावर जास्त सेलिब्रेशन करत नाही किंवा पराभवानंही फार निराश होत नाही. 167 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवी टीमची अवस्था बिकट झाली होती. 13 रनवरच न्यूझीलंडने मार्टिन गप्टील (Martin Guptill) आणि केन विलियमसनच्या (Kane Williamson) विकेट गमावल्या होत्या, पण डॅरेल मिचेलने (Darell Mitchell) डेवॉन कॉनवेसोबत (Devon Conway) पार्टनरशीप करून न्यूझीलंडला सावरलं. मिचेल 47 बॉलमध्ये 72 रनवर नाबाद राहिला. ENG vs NZ: बेअरस्टोच्या चुकीमुळे झाली वर्ल्ड कप फायनलची आठवण, पाहा VIDEO
    Published by:News18 Desk
    First published: