Home /News /sport /

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का, BCCI ची मागणी ECB नं फेटाळली

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का, BCCI ची मागणी ECB नं फेटाळली

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या (WTC Final) अनुभवातून शहाणे होत बीसीसीआयनं (BCCI) इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सराव सामना खेळायला मिळण्याची मागणी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडे (ECB) केली होती.

    लंडन, 26 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final) एकही सराव सामना न खेळल्याचा फटका टीम इंडियाला बसला. भारतीय टीमची कमी तयारी मैदानात उघडी पडली आणि न्यूझीलंडनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. या अनुभवातून शहाणे होत बीसीसीआयनं (BCCI) इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सराव सामना खेळायला मिळण्याची मागणी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडे (ECB) केली होती. नॉटींगहममध्ये 4 ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या पहिल्या टेस्टपूर्वी एकही सराव सामना नसल्याबद्दल टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बीसीसीआयनं इसीबीकडं सराव सामन्यांची मागणी केली. पण, इसीबीनं ही मागणी फेटळली आहे. भारतीय क्रिकेट टीमला अंतर्गत दोन टीम बनवून चार दिवसांचे दोन सामने खेळावे लागतील असं इसीबीच्या प्रवक्त्यानं स्पष्ट केलं आहे. का घेतला निर्णय? कोरोना व्हायरसमुळे हा निर्णय घेतल्याचं इसीबीनं स्पष्ट केलं आहे. इंग्लिश काऊंटी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंची नियमित कोरोना चाचणी घेण्यात येत आहे, पण त्यांना बायो-बबलमध्ये ठेवण्यात आलेलं नाही. टीम इंडियाचे खेळाडू 14 जुलै रोजी ब्रेक संपल्यानंतर पुन्हा एकदा बायो-बबलमध्ये प्रवेश करतील. बायो-बबलच्या बाहेर असणाऱ्या काऊंटी खेळाडूंपासून टीम इंडियाच्या खेळाडूंना धोका आहे. हा सराव सामने न खेळवण्याचा प्रमुख मुद्दा आहे. टीम इंडियाच्या 20 दिवसांच्या सुट्टीवर माजी कॅप्टन नाराज, विराटवरही केली टीका इंग्लंड दौऱ्यावर भारतीय टीम 20 प्रमुख खेळाडू आणि 4 अतिरिक्त खेळाडूंसह गेली आहे. त्यामुळे त्यांना या खेळाडूंची दोन टीममध्ये विभागणी करुन सामना खेळणे शक्य आहे. महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी भारतीय टीमला टेस्ट सीरिजपूर्वी काऊंटी टीमसोबत खेळण्याची संधी मिळत असे. अंतर्गत सामन्यांमध्ये आऊट झालेला खेळाडू पुन्हा खेळायला येऊ शकतो. पण अधिकृत प्रथमश्रेणी सामन्यात तसे होत नाही. या फरकाकडं गावसकर यांनी लक्ष वेधले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BCCI, Cricket news, India vs england

    पुढील बातम्या