अबुधाबी, 20 नोव्हेंबर: अबुधाबीत सध्या सुरु असलेल्या टी-10 सामन्याचा एका पेक्षा एक तुफान खेळी पाहायला मिळत आहेत. लीगमधील 14व्या सामन्यात अशीच एक वादळी खेळी सर्वांनी पाहिली. येथील शेख जायद स्टेडिअमवर दिल्ली बुल्स आणि नॉर्दर्न वॉरिअर्स यांच्यात झालेल्या सामन्यात एका फलंदाजाने 25 चेंडूत 56 धावांची खेळी केली. सामन्यात दिल्ली बुल्सने प्रथम फलंदाजी करत 10 षटकात 110 धावा केल्या. यात कर्णधार मॉर्गन याने 28 चेंडूत 56 धावा केल्या. दिल्लीने दिलेले विजयाचे लक्ष्य नॉर्दर्न वॉरिअर्सने सहज पार केले. यात निकोलस पूरन (Nicholas Pooran)याच्या धमाकेदार खेळीचा समावेश देखील होता.
कोण आहे डे-नाईट कसोटीचा बादशहा; सामना पाहण्याआधी जाणून घ्या Records
वेस्ट इंडिजच्या निकोलसने लेंडल सिमन्स याच्या सोबत डावाची सुरुवात केली. पहिल्या चेंडूपासून निकोलस दिल्ली बुल्सच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने 4 चौकार आणि 5 षटकारांसह 25 चेंडूत 56 धावा केल्या. निकोलसच्या या वादळी खेळीमुळे दिल्लीच्या गोलंदाजाची लय बिघडली. निकोलसच्या या खेळीमुळे नॉर्दर्नने हा सामना 6 विकेट राखून जिंकला. निकोलसने चौकार आणि षटकाराने 46 धावाकेल्या. पहिल्या विकेटसाठी त्याने सिमन्स सोबत 48 धावांची भागिदारी केली. त्यानंतरआंद्र रसेल याने देखील वेगवान धावा केल्या. रसेलने 8 चेंडूत 22 धावा केल्या यात प्रत्येकी दोन चौकार आणि षटकाराचा समावेश होता.
चार सामन्याच्या बंदीचा काढला राग
काही दिवसांपूर्वी लखनऊमध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी निकोलस पूरनवर 4 टी-20 सामन्याची बंदी घातली होती. त्याच्यावर इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली होती पण तो इंटरनॅशनल लीग खेळू शकतो. चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी त्याने आणि क्रिकेट बोर्डाने माफी देखील मागितली होती.