'विराट'सेनेसमोर न्यूझीलंडमध्ये इतिहास घडवण्याचे आव्हान

रँकिंगमध्ये भारतीय संघ जरी न्यूझीलंडवर भारी असला तरीही इतिहास पाहता हा दौरा भारतासाठी सोपा नाही.

  • Share this:

भारत-न्यूझीलंड यांच्यातील 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत दोन्ही संघ आपली आयसीसी क्रमवारी सुधारण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.

आयसीसीच्या 2018 च्य़ा पुरस्कारात ट्रिपल धमाका केलेल्या कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका विजय साजरा केलेल्या विराटसेनेला न्यूझीलंडमध्ये विजय मिळवणं सोपं नाही.

ऑस्ट्रेलियात खेळलेल्या खेळाडूंचाच न्यूझीलंडविरूद्धच्या संघात समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी हार्दिक पांड्या आणि केएल राहूल यांना वादामुळे या दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. तर जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे.

पांड्या आणि के एल राहूल यांच्या जागी विजय शंकर आणि शुभमन गिल तर बुमराहऐवजी मोहम्मद सिराजला संधी दिली आहे.

भारताला सलामीच्या फलंदाजांच्या फॉर्मची चिंता सतावत आहे. विराट कोहली वगळता रोहित शर्मा, शिखर धवन दोघानाही लय कायम राखण्यात अपयश येत आहे. तर मधल्या फळीत धोनी सोडला तर अंबाती रायडू, केदार जाधव, दिनेश कार्तिक यांचीही परिस्थिती वेगळी नाही.

हार्दिक पांड्याच्या जागी घेतलेल्या विजय शंकर हा नवखा खेळाडू आहे. त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव कमी आहे.

वेगवान गोलंदाज बुमराहची जबाबदारी कोण पार पाडणार हा प्रश्नही भारतीय संघासमोर आहे.

रँकिंगबाबत भारतीय संघ जरी न्यूझीलंडवर भारी असला तरीही इतिहास पाहता हा दौरा भारतासाठी सोपा नाही. न्यूझीलंडमध्ये 35 एकदिवसीय सामन्यांपैकी भारताने आतापर्यंत 10 सामने जिंकले आहेत. तर फक्त एकदाच मालिका जिंकली आहे. गेल्यावेळी न्यूझीलंडने भारताला 4-0 ने पराभूत केले होते.

रँकिंगबाबत भारतीय संघ जरी न्यूझीलंडवर भारी असला तरीही इतिहास पाहता हा दौरा भारतासाठी सोपा नाही. न्यूझीलंडमध्ये 35 एकदिवसीय सामन्यांपैकी भारताने आतापर्यंत 10 सामने जिंकले आहेत. तर फक्त एकदाच मालिका जिंकली आहे. गेल्यावेळी न्यूझीलंडने भारताला 4-0 ने पराभूत केले होते. पुढे वाचा... #IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू!

ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडमध्ये पोहचला आहे. 23 जानेवारीपासून वनडे, टी20 मालिका सुरु होणार आहे.

भारत-न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची वनडे मालिका 23 जानेवारी ते 03 फेब्रुवारी या कालावधीत खेळण्यात येणार आहे. त्यानंतर 6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत टी20 मालिका होणार आहे.

वनडे क्रमवारीत भारतीय संघ 121 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर इंग्लंड 113 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेत विजय मिळवून नंबर वन होण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करतील.

भारतीय संघ सध्या पुर्ण फॉर्ममध्ये आहे. कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनीसह फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियात विजय मिळवून दिला. विराटच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात इतिहास घडवणाऱ्या संघाचा विजयी रथ न्यूझीलंड रोखू शकते.

न्यूझीलंडने पहिल्या तीन वनडे सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. या संघात अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा समावेश केला आहे. त्यामुळे भारतीय संघाला हा दौरा ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत जड जाऊ शकतो.

फलंदाजीचा विचार केला तर न्यूझीलंडकडे मार्टीन गुप्टील, कॉलिन मनरो आणि केन विल्यम्सन सारखे खंदे फलंदाज आहेत. तर मधल्या फळीत रॉस टेलर, टॉम लेथम, हेन्री निकोलस हे फलंदाज फॉर्ममध्ये आहेत.

न्यूझीलंडच्या गोलंदाजामध्ये भेदक मारा करणारा ट्रेंट बोल्टचे आव्हान भारतीय फलंदाजांसमोर असणार आहे. त्याशिवाय टीम साऊथी, मॅट हेन्री हे फलंदाजांची डोकेदुखी वाढवू शकतात.

कॉलिन ग्रँडहोम आणि मिशेल सँटनर हे अष्टपैलू खेळाडू न्यूझीलंडकडे आहेत. त्यात घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा इंग्लंडला होऊ शकतो.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयाने आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय संघासमोर न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. हार्दीक पांड्या आणि जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाला याचा फटका बसू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2019 04:23 PM IST

ताज्या बातम्या