IPL 2020 प्लेऑफ आणि सेमीफायनल दोन्ही कशाप्रकारे ठरतात वेगळे? जाणून घ्या संपूर्ण नियम

आयपीएलमध्ये 2011 साली पहिल्यांदा प्लेऑफची सुरुवात झाली. न्यूझीलंडमधील रग्बी लीग आणि ऑस्ट्रेलियाच्या फुटबॉल लीगमध्ये प्लेऑफ खूप लोकप्रिय आहे. हे पाहून बीसीसीआयने आयपीएलमध्येही देखील याची सुरूवात केली

आयपीएलमध्ये 2011 साली पहिल्यांदा प्लेऑफची सुरुवात झाली. न्यूझीलंडमधील रग्बी लीग आणि ऑस्ट्रेलियाच्या फुटबॉल लीगमध्ये प्लेऑफ खूप लोकप्रिय आहे. हे पाहून बीसीसीआयने आयपीएलमध्येही देखील याची सुरूवात केली

  • Share this:
    मुंबई, 05 नोव्हेंबर: आयपीएल 2020 ची टी-20 (IPL 2020) क्रिकेट स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. मुंबई इंडियन्स (Mumabai Indians) ची मजबूत टीम आणि आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन करणारी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आज गुरुवारी पहिल्या क्वालिफायरसाठी चुरशीची लढत होणार आहे. आतापर्यंत कोणत्याही क्रिकेट, फुटबॉल किंवा हॉकी स्पर्धेत फायनलपूर्वी सेमीफायनल (Semi Final) सामने खेळले जायचे. पण आयपीएलमधील नियम थोडे वेगळे आहेत. या स्पर्धेत सेमीफायनल नव्हे तर प्लेऑफ (IPL Playoff) सामने खेळले जातात. प्लेऑफ आणि सेमीफायनल हे कसे वेगळे आहेत ते समजून घेऊया. आयपीएलच्या स्पर्धेत प्लेऑफ ची सुरुवात कशी झाली? आयपीएल ही आधी इतर क्रिकेट स्पर्धांप्रमाणेच सेमीफायनल आणि फायनलचा फंडा होता. चार टॉप संघांचा प्रवेश थेट सेमीफायनल फेरीत होत असे आणि त्यानंतर फायनल खेळली जात असे. पण 2011 मध्ये पहिल्यांदा प्लेऑफची सुरुवात झाली. न्यूझीलंडमधील रग्बी लीग आणि ऑस्ट्रेलियाच्या फुटबॉल लीगमध्ये प्लेऑफ खूप लोकप्रिय आहे. हे पाहून बीसीसीआयने आयपीएलमध्येही देखील याची सुरूवात केली. (हे वाचा-टीममध्ये निवड होण्याकरता वडिलांकडे मागण्यात आली होती लाच, विराटचा गौप्यस्फोट) प्लेऑफमध्ये काय वेगळं आहे? सेमीफायनल प्रमाणेच येथेही पॉईंट्स टेबलमधील चार टॉप संघांना प्रवेश देण्यात येतो. सेमीफायनलच्या फॉर्म्युलामध्ये फायनल सामना गाठण्यासाठी फक्त दोन सामने खेळले जायचे - पहिला सामना पॉइट टेबलनमध्ये पहिल्या आणि चौथ्या स्थानावर असणाऱ्या संघांमध्ये आणि दुसरा हा पॉईंट्स टेबलमधील दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघात व्हायचा. पण आता प्लेऑफच्या नियमानुसार फायनल सामन्यापूर्वी तीन सामने असतात - पहिला क्वालिफायर, एलिमिनेटर आणि दुसरा क्वालिफायर. प्लेऑफ सामने कसे असतात? क्वालिफायर वन : प्लेऑफमध्ये पहिला क्रमांक गाठणारा संघ हा दुसर्‍या क्रमांकाच्या संघाशी सामना खेळतो. त्यांच्यातील विजयी संघाला थेट फायनलमध्ये प्रवेश मिळतो. याला क्वालिफायर वन असं म्हणतात. यावेळी क्वालिफायर वनमध्ये मुंबई आणि दिल्ली यांच्यात दमदार सामना होणार आहे. (हे वाचा-मुंबई इंडियन्सनं दाखवला आणि पाहिला '10 का दम', नावावर केला हा विक्रम) एलिमिनेटर : तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकांवरील संघातील सामन्याला एलिमिनेटर म्हणतात. यात हरणारा संघ स्पर्धेतून थेट बाहेर पडतो. क्वालिफायर दोन : एलिमिनेटरमधील विजयी संघ आणखी एक सामना खेळतो ज्याला क्वालिफायर म्हणतात. यात त्याचा सामना पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झालेल्या संघाशी होतो. यांच्यातील विजयी संघ थेट फायनलमध्ये पोहोचतो. त्यामुळे क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेल्या संघाला पुन्हा एकदा अंतिम फेरीत जाण्याची संधी उपलब्ध असते. फायनल : क्वालिफायर 1 आणि क्वालिफायर 2 यांच्या विजेत्यांमध्ये फायनल खेळली जाते. प्लेऑफचा फायदा पहिले दोन स्थानं मिळवणाऱ्या संघांना फायनलमध्ये पोहोचण्याच्या दोन संधी मिळतात. त्यामुळे प्रत्येक सामन्यात प्रेक्षकांना रस असतो. प्रत्येक संघाला या पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवायचे असते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: