Home /News /sport /

T20 WCआधी किवींना धक्का; कॅप्टन विल्यमसन संघातून होणार आऊट?

T20 WCआधी किवींना धक्का; कॅप्टन विल्यमसन संघातून होणार आऊट?

Kane Williamson

Kane Williamson

भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (WTC Final) जिंकल्यानंतर न्यूझीलंड लागोपाठ दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी आता टी20 वर्ल्डकप (ICC T20 Worldcup) स्पर्धेतील मैदानात उतरणार आहे. दरम्यान, एक वाईट बातमी समोर आली आहे.

  नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर: भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (WTC Final) जिंकल्यानंतर न्यूझीलंड लागोपाठ दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी आता टी20 वर्ल्डकप (ICC T20 Worldcup) स्पर्धेतील मैदानात उतरणार आहे. दरम्यान, एक वाईट बातमी समोर आली आहे. जायबंदी झाल्याने कर्णधार विल्यमसन (Kane Williamson Can Miss T20 World Cup due to Knee Injury)काही सामन्यातून बाहेर पडू शकतो असे वृत्त न्यूझीलंडचे मुख्य कोच गॅरी स्टीड यांनी दिले आहे. इंग्लंडने बुधवारी टी -20 विश्वचषक सराव सामन्यात न्यूझीलंडचा 13 धावांनी पराभव केला. विल्यमसन या सामन्यात फील्डिंग करताना दिसला. विल्यमसनच्या कोपऱ्याला दुखापत झाली असून पहिल्या सराव सामन्यानंतर त्यात आणखी वाढ झाली आहे. विल्यमसनने त्या सामन्यात 30 चेंडूत 37 धावा केल्या होत्या, पण न्यूझीलंडला तीन विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले. कर्णधार केन विल्यमसन काही सामन्यांसाठी बाहेर राहण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता स्टीड म्हणाले, हो ही शक्यता आहे. आम्हाला आशा आहे की जर त्याला योग्य विश्रांती आणि संतुलन मिळाले तर तो खेळू शकेल. असे मत स्टीड यांना यावेळी व्यक्त केले. न्यूझीलंडला मंगळवारी पाकिस्तानशी खेळायचे आहे, परंतु उर्वरित चार सुपर 12 सामने सात दिवसांच्या आत खेळावे लागतील, ज्यामध्ये विश्रांतीची शक्यता कमी आहे.

  न्यूझीलंडची टीम (New Zealand Squad)

  केन विलियमसन (कर्णधार), टोड अॅस्टल, ट्रेन्ट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉन्वे, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, केली जेमीसन, डेरिल मिशेल, जिमी निशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, टीम सिफर्ट (विकेटकीपर), ईश सोधी, टीम साउदी

  न्यूझीलंडचं वेळापत्रक (New Zealand Schedule)

  26 ऑक्टोबर- न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान- संध्याकाळी 7.30 वाजता 31 ऑक्टोबर- न्यूझीलंड विरुद्ध भारत- संध्याकाळी 7.30 वाजता 3 नोव्हेंबर- न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर (बी-1)- दुपारी 3.30 वाजता 5 नोव्हेंबर- न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर (ए-2)- दुपारी 3.30 वाजता 7 नोव्हेंबर- न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान- दुपारी 3.30 वाजता
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: New zealand, T20 cricket, T20 league, T20 world cup

  पुढील बातम्या