मुंबई, 25 एप्रिल : दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) ऑल राऊंडर ब्योर्न फोर्टुइन (Bjorn Fortuin) यानं इस्लाम धर्म स्वीकारला आहे. 26 वर्षांच्या या क्रिकेटपटूनं सप्टेंबर 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार रमजान महिन्यात ब्योर्ननं त्याच्या पत्नीसह इस्लाम धर्म स्वीकारला आहे. आता इमाद असं त्याचं नाव आहे. ब्योर्नचा दक्षिण आफ्रिकन टीममधील खेळाडू तरबेज शम्सी (Tabraiz Shamsi) याची पत्नी खादीजा शम्सी यांनी ब्योर्नचा पत्नीसह फोटो शेअर केला असून त्यांचं अभिनंदन केलं आहे. ब्योर्नच्या पत्नीचं नाव मिशेक एसेन आहे.
ब्योर्न इस्लाम धर्माचा स्वीकार करणारा दुसरा दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू आहे. यापूर्वी 2011 साली फास्ट बॉलर वेन पार्नेल (Wayne Parnell) याने त्याने त्याचा धर्म बदलला होता. ब्योर्ननं 2013 साली फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मात्र त्याचं पदार्पण निराशाजनक ठरलं होतं. तो त्या मॅचमध्ये शून्यावर आऊट झाला होता, तसंच त्याला एकही विकेट मिळाली नव्हती.
आज कोहली-धोनी आमनेसामने, चेन्नई कसा रोखणार बंगळुरूचा विजयी रथ?
ब्योर्नचा भारताविरुद्ध 2019 साली झालेल्या टी20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये समावेश करण्यात आला होता. त्यानं 7 फेब्रुवारी 2020 रोजी इंग्लंड विरुद्ध झालेल्या वन-डे मॅचमध्ये पदार्पण केलं. बोर्ननं 7 टी 20 मॅचमध्ये एकूण 6 विकेट्स घेतल्या आहेत. तर 5 इनिंगमध्ये 35 रन काढले आहेत. ब्योर्ननं दक्षिण आफ्रिकेकडून शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच याच महिन्यात पाकिस्तान विरुद्ध खेळली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Muslim, Religion, South africa, Sports