मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'तो' मला नोकराप्रमाणे वागवायचा, पाकिस्तानच्या माजी कॅप्टनवर वसिम अक्रमचा गंभीर आरोप

'तो' मला नोकराप्रमाणे वागवायचा, पाकिस्तानच्या माजी कॅप्टनवर वसिम अक्रमचा गंभीर आरोप

'स्विंगचा सुलतान' म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर वसीम अक्रमने एक मोठा खुलासा केला आहे.

'स्विंगचा सुलतान' म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर वसीम अक्रमने एक मोठा खुलासा केला आहे.

'स्विंगचा सुलतान' म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर वसीम अक्रमने एक मोठा खुलासा केला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 नोव्हेंबर :   'स्विंगचा सुलतान' म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर वसीम अक्रमने एक मोठा खुलासा केला आहे. त्याने त्याचा सहकारी खेळाडू सलीम मलिकवर धक्कादायक आरोप केले आहेत. सलीम आपल्याला नोकराप्रमाणे वागणूक द्यायचा, असं अक्रमने म्हटलंय. अक्रमने त्याच्या 'सुल्तान: अ मेमॉर' या बायोग्राफीमध्ये या गोष्टींचा खुलासा केला आहे. मलिक सीनिअर असल्याचा गैरफायदा घेत त्याच्याशी 'नोकरा'प्रमाणे वागायचा, असं अक्रमने म्हटलंय. मलिकने पाकिस्तान क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर दोन वर्षांनी वसीम अक्रमने 1984 मध्ये पदार्पण केलं होतं. या संदर्भात ‘एनडीटीव्ही हिंदी’ने वृत्त दिलंय.

काय म्हणाला अक्रम?

अक्रमने लिहिलंय की, "तो मी ज्युनिअर असल्याचा गैरफायदा घेत असत. ते  निगेटिव्ह आणि स्वार्थी होते आणि माझ्याशी एका नोकराप्रमाणे वागायचे. मी त्यांना मसाज करावा, असंही ते म्हणाले होते. त्यांनी मला त्यांचे कपडे आणि बूट धुवायला सांगितलं होतं. त्यावेळी टीममध्ये रमीझ, ताहिर, मोहसीन, शोएब मोहम्मद हे तरूण क्रिकेटर होते. त्यांच्यसोबत मी नाईट क्लबमध्ये जायचो. तेव्हा सलीम मलिकचा मला खूप राग यायचा,” असा खुलासा अक्रमने केलाय.

वसीम अक्रमने 1984 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाकडून इंटरनॅशनल क्रिकेट करिअरची सुरुवात केली होती. वसीम अक्रमने पाकिस्तान क्रिकेट टीमसाठी 356 वन-डे मॅचेसमध्ये 502 विकेट घेतल्या आहेत. तर, पाकिस्तानकडून 104 टेस्ट मॅचेमध्ये 414 विकेट घेतल्या होत्या.

मला एकही पैसा नको! इंग्लंडच्या 'या' खेळाडूचा मोठा निर्णय, पाहा काय आहे कारण?

अक्रम आणि मलिक दोघंही दीर्घकाळ पाकिस्तान टीमकडून क्रिकेट खेळत होते. पण त्यांचं एकमेकांशी पटत नव्हतं. खेळतानाही ते एकमेकांशी बोलत नाहीत, अशा बातम्या कायम यायच्या. अक्रम मलिकच्या नेतृत्वात क्रिकेट खेळला. तर, 1992-1995 मध्ये पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन म्हणूनही अक्रमने कामगिरी बजावली. तेव्हा पाकिस्तानने 12 पैकी 7 टेस्ट आणि 34 पैकी 21 वन-डे मॅचेस जिंकल्या होत्या.

न्यूझीलंड दौऱ्यानंतर टीम इंडिया बदलणार, 8 खेळाडू होणार बाहेर!

सलिम मलिकला 2000 साली मॅच फिक्सिंगमध्ये दोषी ठरवण्यात आलं. त्याच्यावर क्रिकेट खेळण्यास आजीवन बंदी घालण्यात आली. त्यावेळीही मलिकने अक्रम आणि वकार युनूस या दोघांकडून कठोर वागणूक देण्यात आल्याचं म्हटलं होतं. अक्रम कॅप्टन असतानाही आपल्याशी बोलणं टाळत होता, असा दावाही मलिकने केला होता. आता सलीम मलिक वसीम अक्रमच्या आरोपांवर काय उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Cricket news, Pakistan