मुंबई, 26 जून : कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय क्रिकेट टीमनं वर्ल्ड कप जिंकण्याच्या घटनेला आता 38 वर्ष पूर्ण झाली आहेत. 1983 च्या वर्ल्ड कपमध्ये दुबळ्या समजल्या जाणाऱ्या या टीमनं 11 संघाना मागे टाकत विश्वविजेतपद पटकावले. फायनल मॅचमध्ये तर बलाढ्य वेस्ट इंडिजला पराभूत करण्याचा पराक्रम त्या टीमनं केला होता. या ऐतिहासिक घटनेला शुक्रवारी 38 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळी कपिलच्या टीममधील सर्व जुने सहकारी एकत्र आले. त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कपिलच्या बॅगेत होती शॅम्पेन
'इंडिया टुडे' मधील कार्यक्रमात सहभागी झालेले क्रिकेटपटू किर्ती आझाद (Kiriti Azad) यांनी यावेळी एक त्या वर्ल्ड कप दरम्यानचा एक नवा किस्सा सांगितला. " मी दौऱ्याच्या सुरुवातीला कपिल देवच्या बॅगेत शॅम्पेनची बॉटल पाहिली होती. तो ती प्रत्येक मॅचला सोबत घेऊन जात असे. मी त्याला अखेर एकेदिवशी विचारले तू तर पित नाहीस मग या बाटलीचं काय करणार? आम्हाला देऊन टाक. पण कपिलनं तसं केलं नाही.
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर लॉर्ड्सच्या बाल्कनीमध्ये जी पहिली शॅम्पेनची बॉटल उघडली गेली होती ती तीच होती. त्यावरुन कपिलला पहिल्या दिवसापासूनच विश्वविजेतेपदाची किती खात्री होती हे दिसून येते." असं आझाद यांनी सांगितले.
कपिलनं सांगितलं कारण
कपिल देवनं त्यानंतर याचं कारण सांगितलं. "मी 83 च्या वर्ल्ड कपच्या दरम्यान हँडबॅगेत शॅम्पेनची बॉटल ठेवली होती. फायनल मॅच झाल्यानंतरच ती उघडण्याचा मी निर्णय घेतला होता. त्याबाबतचा माझा निर्धार पक्का होता."
WTC Final मधील पराभवानंतर टीम इंडियाची सुट्टी सुरू, पाहा Photos
वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या फायनल मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटींग करताना भारतीय टीमनं फक्त 183 रन काढले होते. त्यावेळी वेस्ट इंडिज टीम ही मॅच आरामात जिंकेल असा सर्वांचा अंदाज होता. मात्र त्यावेळी टीम इंडियानं जिद्दीनं खेळ करत वेस्ट इंडिजचा 43 रननं पराभव केला आणि लॉर्ड्सच्या बाल्कनीत कपिल देव यांनी विश्वविजेपदाचा करंडक उंचावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.