मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

मास्टर ब्लास्टर आहे 17 वर्षीय क्रिकेटपटूचा 'जबरा फॅन', पहिल्याच टेस्टमध्ये धमाल करेल असा विश्वास

मास्टर ब्लास्टर आहे 17 वर्षीय क्रिकेटपटूचा 'जबरा फॅन', पहिल्याच टेस्टमध्ये धमाल करेल असा विश्वास

या मॅचमध्ये युवा खेळाडू शेफाली वर्मा (Shefali Varma) धमाल करेल, अशी भविष्यवाणी साक्षात क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) केली आहे. त्यामुळे शेफालीच्या कामगिरीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 16 जून: भारत (India) आणि इंग्लंडच्या (England) महिला क्रिकेट टीममध्ये (Women Cricket Team) ब्रिस्टलच्या मैदानावर आज पहिली आणि एकमेव टेस्ट मॅच (Test match) होत आहे. भारतीय महिला क्रिकेट टीम तब्बल सात वर्षांनी आपली पहिली टेस्ट मॅच खेळत आहे. या मॅचमध्ये युवा खेळाडू शेफाली वर्मा (Shefali Varma) धमाल करेल, अशी भविष्यवाणी साक्षात क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) केली आहे. त्यामुळे शेफालीच्या कामगिरीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तेंडुलकरनं या 17 वर्षांच्या युवा क्रिकेटरला टेस्ट मॅचमधील पदार्पणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शेफाली क्रिजवर येईल तेव्हा आपल्या तडाखेबाज खेळीनं प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, असा विश्वास सचिन तेंडुलकरनं व्यक्त केला आहे. शेफाली वर्मानं वयाच्या 15 व्या क्रिकेटमध्ये पदार्पण केलं असून टी-20 क्रिकेटमध्ये तिनं उत्तम कामगिरी केल्यानं तिची टेस्ट क्रिकेटमध्ये भारतीय संघात निवड झाली आहे. आपल्या आक्रमक खेळासाठी आणि शॉटससाठी शेफाली प्रसिद्ध आहे.

आपल्या आक्रमक शैलीनं महिला क्रिकेटमध्ये सर्वांच लक्ष वेधून घेणाऱ्या शेफाली वर्मानं वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी टेस्ट मॅचमध्ये पदार्पण करून सचिन तेंडुलकरनं वयाच्या 16 व्या वर्षी केलेल्या टेस्ट क्रिकेटमधील पदार्पणाची आठवण करून दिली आहे. आपल्या पदार्पणाच्या टेस्ट मॅचमध्ये सचिननं वसीम अक्रम, वकार युनुस या कसलेल्या बॉलर्सचा सामना केला होता.

हे वाचा-Coca Cola पाहून भडकला रोनाल्डो, कंपनीनं झटक्यात गमावले 29323 कोटी; पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियामध्ये सचिन तेंडुलकरची शेफालीशी भेट झाली होती. त्यावेळी त्यानं तिला मार्गदर्शन केलं होतं. त्याबद्दल सांगताना तो म्हणाला, ‘ऑस्ट्रेलियात वणव्यांचा फटका बसलेल्या लोकांच्या मदतीसाठी निधी जमा करण्यासाठी आम्ही एक मॅच खेळत होतो तेव्हा मी शेफालीला भेटलो होतो. त्यावेळी तिला मी, बॅटिंग करताना आणि शॉट मारतानाची तुझी नैसर्गिक पद्धतीनं खेळण्याची शैली मला आवडते. आपल्या खेळावर कसून मेहनत घे, असं सांगितलं होतं.’

इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे, त्याचं शेफाली सोनं करेल, असा विश्वास सचिनला आहे. ‘17 वर्षाच्या कोणत्याही खेळाडूमध्ये जो उत्साह, ऊर्जा असते, ती शेफालीकडं आहे. तिनं खूप छान प्रगती केली असून ती भारतासाठी खेळत आहे, याचा मला आनंद आहे. तिच्या खेळात लोकांचे लक्ष वेधून घेण्याची आणि त्यांना खिळवून ठेवण्याची क्षमता आहे, त्यामुळं ती भारताच्या नाही तर जागतिक क्रिकेटमध्येही महत्त्वाचं स्थान मिळवेल, असा विश्वासही त्यानं व्यक्त केला आहे.

हे वाचा-WTC Final भारत जिंकणार का न्यूझीलंड? विराट-केनचे आकडे काय सांगतात?

भारतीय महिला क्रिकेट संघाची या आधीची टेस्ट मॅच नोव्हेंबर 2014 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाली होती. यामध्ये मिताली राजच्या नेतृत्वाखालील संघानं एका डावानं ही टेस्ट जिंकली होती. त्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ आता टेस्ट मॅच खेळत आहे.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Sachin tendulakar