Home /News /sport /

माजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

माजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

देशातील प्रथम श्रेणी क्रिकेट (First Class Cricket) गाजवलेले ऑल राऊंडर विजयकृष्णा (Vijaykrishna) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 71 वर्षांचे होते.

    बंगळुरु, 17 जून : देशातील प्रथम श्रेणी क्रिकेट (First Class Cricket) गाजवलेले ऑल राऊंडर विजयकृष्णा (Vijaykrishna) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. विजकृष्णा यांनी 80 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 2 शतकांसह 2297 रन काढले. त्याचबरोबर 194 विकेट्स घेतल्या. कर्नाटक टीमचे प्रतिनिधित्व केलेल्या विजय यांनी बंगळुरुतील सिटी हॉस्पिटलमध्ये  अखेरचा श्वास घेतला. भारतीय टीमकडून खेळण्याची पूर्ण क्षमता असूनही त्यांचे क्रिकेट लेग स्पिनर बिशनसिंग बेदी यांच्या सावलीत वाढले. इरापल्ली प्रसन्न आणि बी.एस. चंद्रशेखर यांना खंबीर साथ देण्याचे काम विजय यांनी केले. 1970 आणि 80 च्या दशकातील कर्नाटक टीमचे ते आधारस्तंभ होते. कर्नाटकच्या पहिल्या रणजी विजेत्या टीमचे ते सदस्य होते. कर्नाटकने 1974 साली जयपूरमध्ये झालेल्या रणजी स्पर्धेच्या फायनलमध्ये राजस्थानचा पराभव केला होता. कर्नाटकच्या या विजयात विजयकृष्णा यांनी निर्णायक क्षणी केलेल्या 71 रनच्या खेळीचा निर्णायक वाटा होता. 1977-8 आणि 1982-83 च्या सिझनमध्ये रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमचे ते सदस्य होते. संजनानं घेतली बुमराहची मुलाखत, Photos मधून उलगडलं आयुष्य, पाहा VIDEO कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुराप्पा (BS Yediyurappa ) यांनी विजयकृष्णा यांच्या निधनाबद्द शोक व्यक्त केला आहे. कर्नाटकच्या दोन रणजी विजेतेपदामध्ये विजय यांचे योगदान होते, अशी प्रतिक्रिया येडियुराप्पा यांनी दिली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Karnataka

    पुढील बातम्या