Home /News /sport /

NZ vs WI : बॉलर असूनही साऊदीची पॉण्टिंगशी बरोबरी, आता धोनीचं रेकॉर्ड निशाण्यावर

NZ vs WI : बॉलर असूनही साऊदीची पॉण्टिंगशी बरोबरी, आता धोनीचं रेकॉर्ड निशाण्यावर

दिग्गजांच्या यादीत बॉलर असूनही न्यूझीलंडच्या टीम साऊदी (Tim Southee) च्या नावाचा समावेश झाला आहे. टीम साऊदी याने शुक्रवारी रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) च्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे.

    ऑकलंड, 4 डिसेंबर : क्रिकेटमध्ये धमाकेदार बॅट्समनच्या यादीमध्ये क्रिस गेल, कायरन पोलार्ड, रोहित शर्मा, बेन स्टोक्स यांचं नाव घेतलं जातं. याआधी एमएस धोनी, वीरेंद्र सेहवाग, रिकी पॉण्टिंग, ब्रॅन्डन मॅक्कलम, एडम गिलख्रिस्ट यांच्या नावाचा समावेश होतो. या दिग्गजांच्या यादीत बॉलर असूनही न्यूझीलंडच्या टीम साऊदी (Tim Southee) च्या नावाचा समावेश झाला आहे. टीम साऊदी याने शुक्रवारी रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) च्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. लवकरच साऊदी एमएस धोनीला पिछाडीवर टाकू शकतो. टीम साऊदीने वेस्ट इंडिज (New Zealand vs West Indies) विरुद्धच्या मॅचमध्ये 10 बॉल खेळून नाबाद 11 रन केले. या इनिंगमध्ये साऊदीने एक सिक्सही मारली. याचसोबत साऊदीच्या टेस्ट क्रिकेटमधल्या एकूण सिक्सची संख्या 73 झाली आहे. पॉण्टिंगनेही त्याच्या कारकिर्दीमध्ये एवढ्याच सिक्स लगावल्या आहेत. साऊदीने 74 मॅचमध्येच 73 सिक्स मारले, तर पॉण्टिंगला एवढे सिक्स मारायला 168 टेस्ट लागल्या होत्या. टेस्टमध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या खेळाडूंमध्ये साऊदी टॉप-15 मध्ये पोहोचला आहे. टेस्टमध्ये सर्वाधिक सिक्स लगावण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या ब्रॅण्डन मॅक्कलमच्या नावावर आहे. मॅक्कलमने टेस्टमध्ये 107 सिक्स मारले आहेत. तर ऍडम गिलख्रिस्ट 100 सिक्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताकडून सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम सेहवागच्या नावावर आहे, त्याने टेस्टमध्ये 91 सिक्स मारले होते. मॅकल्लम, गिलख्रिस्ट, क्रिस गेल आणि जॅक कॅलिस यांच्यानंतर सेहवाग या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. धोनी 78 सिक्ससह 13 व्या क्रमांकावर आहे. साऊदीच्या निशाण्यावर आता बेन स्टोक्स (74 सिक्स) आणि धोनीचं रेकॉर्ड आहे. धोनीच्या पुढे जायला साऊदीला आता सहा सिक्सची गरज आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या