IND vs NZ: न्यूझीलंडच्या भूमीवर भारत विजयाची गुढी उभारणार का?

IND vs NZ: न्यूझीलंडच्या भूमीवर भारत विजयाची गुढी उभारणार का?

वनडे मालिकेत न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता भारतीय संघ टी-20 मालिकेत धमाकेदार कामगिरी करण्यास सज्ज झाला आहे.

  • Share this:

वेलिंग्टन, 06 फेब्रुवारी: वनडे मालिकेत न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता भारतीय संघ टी-20 मालिकेत धमाकेदार कामगिरी करण्यास सज्ज झाला आहे. पण आकडेवारीवर नजर टाकल्यास टी-20 भारतीय संघची कामगिरी न्यूझीलंडविरुद्ध अतिशय खराब आहे. 2007च्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धचे भारतीय संघाने विजेतेपद मिळवले होते. तेव्हा न्यूझीलंड असा एकमेव संघ होता ज्याविरुद्ध भारताला पराभव स्विकारावा लागला होता. न्यूझीलंडच्या भूमीवर त्यांच्याच विरुद्ध भारताने दोन टी-20 सामने खेळले आहेत. त्या दोन्ही सामन्यात भारताचा पराभव झाला होता.

भारताने न्यूझीलंडचा 2017मध्ये प्रथम टी-20 मालिकेत 2-1 असा पराभव केला होता. आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या 9 टी-20 पैकी भारताला केवळ 2 सामन्यात विजय मिळवता आला आहे. या मालिकेत विजय मिळवून भारताला हे अंतर कमी करण्याची संधी आहे.

विराट कोहलीच्या जागी रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच बरोबर एका मोठ्या कालावधीनंतर धोनी पुन्हा एकदा टी-20च्या मैदानावर दिसेल. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत धोनीला विश्रांती देण्यात आली होती. आता धोनीला अंतिम 11मध्ये संधी मिळते की ऋषभ पंतला हे पाहावे लागेल.

विशेष म्हणजे भारताने गेल्या 10 टी-20 मालिकेपैकी एकही मालिका गमावलेली नाही. तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने 12 टी-20पैकी फक्त एक सामना गमावला आहे. रोहित शर्माला टी-20 प्रकारात सर्वाधिक धावा करण्याची संधी आहे. त्यासाठी त्याला केवळ 36 धावांची गरज आहे. रोहितने 90 सामन्यात 32.89च्या सरासरीने 2 हजार 237 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल अव्वल स्थानी आहे. त्याने 76 सामन्यात 2 हजार 272 धावा केल्या आहेत.

सध्या न्यूझीलंडची टी-20 मालिकेतील कामगिरी खराब आहे. गेल्या सात टी-20 मालिकेपैकी दोनच त्यांना जिंकता आल्या आहेत.

संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, कृणाल पंडय़ा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलिल अहमद.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), डग ब्रेसवेल, कॉलिन डे ग्रँडहोम, लॉकी फग्र्युसन, स्कॉट कगलेनजिन, कॉलिन मुन्रो, डॅरेल मिचेल, मिचेल सान्तनेर, टिम सेईफर्ट, ईश सोधी, टिम साऊदी, रॉस टेलर, ब्लेयर टिकनर, जेम्स नीशाम.

SPECIAL REPORT : भाजप-राष्ट्रवादीत शकुनीमामा आणि चिऊताईचा वाद का पेटला?

First published: February 6, 2019, 8:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading