• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • NZ vs AFG: अफगाणिस्तानवर संपूर्ण देशाची आशा, ट्विटरवर मजेदार Memes Viral

NZ vs AFG: अफगाणिस्तानवर संपूर्ण देशाची आशा, ट्विटरवर मजेदार Memes Viral

न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) यांच्या रविवारी होणाऱ्या मॅचकडं या दोन देशांपेक्षाही जास्त भारतीय फॅन्सचं लक्ष लागलेलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 7 नोव्हेंबर: न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) यांच्या रविवारी होणाऱ्या मॅचकडं या दोन देशांपेक्षाही जास्त भारतीय फॅन्सचं लक्ष लागलेलं आहे. याच मॅचमवर टीम इंडियाच्या सेमी फायनलमध्ये जाण्याच्या सर्व आशा अवलंबून आहेत. त्यामुळे सर्व भारतीय फॅन्स अफगाणिस्तानच्या विजयाची प्रार्थना करत आहेत. या मॅचची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा असून सोशल माीडियावर याचे अनेक मीम्स व्हायरल (Memes Viral) झाले आहेत. न्यूझीलंडनं या मॅचमध्ये अफगाणिस्तानचा पराभव केल्यास त्यांचे आठ पॉईंट्स होतील आणि टीम इंडिया तितके पॉईंट्स मिळवू शकणार नसल्यानं न्यूझीलंडची टीम सेमी फायनलमध्ये दाखल होईल.पण, अफगाणिस्ताननं न्यूझीलंडला हरवण्याचा चमत्कार केला तर टीम इंडियाला सोमवारच्या मॅचमध्ये नामिबियाला हरवून सेमी फायनलमध्ये जाण्याची संधी आहे. न्यूझीलंडची टीम: केन विलियमसन (कॅप्टन), टोड अ‍ॅस्टल, ट्रेन्ट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉन्वे,  मार्टिन गप्टिल, केली जेमीसन, डेरिल मिशेल, जिमी निशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, टीम सिफर्ट, ईश सोधी आणि टीम साऊदी NZ vs AFG LIVE Streaming: न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान लढत कधी आणि कुठे पाहता येणार? अफगाणिस्तानची टीम: मोहम्मद नबी (कॅप्टन), अहमद शहजाद, हरजतउल्लाह जजाई, रहमानुल्‍लाह गुरबाज,  नजीबुल्‍लाह जदरान, राशिद खान, गुलबदीन नईब, नवीन उल हक, मुजीब उर रहमान, करीम जनत, फरीद अहमद, हमीद हसन, शराफुद्दीन अशरफ, उस्मान घानी आणि हसमतउल्लाह शाहिदी
  Published by:News18 Desk
  First published: