मुंबई, 30 डिसेंबर: न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटपटू रॉस टेलरनं (Ross Taylor) निवृत्तीची घोषणा केली आहे. टेलरनं 2006 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. बांगलादेश विरुद्धच्या आगामी सीरिजनंतर (New Zealand vs Bangladesh) टेस्ट क्रिकेटमधून तर ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स विरुद्धच्या सीरिजनंतर वन-डे क्रिकेटमधून रिटायर होणार असल्याचे टेलरनं जाहीर केले.
'मी आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. बांगलादेश विरुद्धच्या दोन टेस्ट तसंच ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स विरुद्ध होणाऱ्या 6 वन-डे नंतर मी निवृत्त होईन. गेल्या 17 वर्षांपासून दिलेल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद,देशाचं प्रतिनिधित्व करायला मिळणे हा माझा बहुमान होता.' असे ट्विट करत टेलरनं निवृत्तीची घोषणा केली आहे.
Today I'm announcing my retirement from international cricket at the conclusion of the home summer, two more tests against Bangladesh, and six odi’s against Australia & the Netherlands. Thank you for 17 years of incredible support. It’s been an honour to represent my country #234 pic.twitter.com/OTy1rsxkYp
— Ross Taylor (@RossLTaylor) December 29, 2021
टेलरचा रेकॉर्ड
टेलरनं आजवर 110 टेस्टमध्ये न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केले आहे. तो या टीमकडून सर्वात जास्त टेस्ट मॅच खेळणारा बॅटर असून टेस्ट तसंच वन-डे मध्ये सर्वात जास्त रन करण्याचा रेकॉर्ड देखील त्याच्या नावावर आहे. टेलरनं 110 टेस्टमध्ये 44.87 च्या सरासरीनं 7584 रन केले आहेत. यामध्ये 19 शतक आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. यावर्षी भारताविरुद्ध झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final) टेलरनं न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसनच्या (Kane Williamson) मदतीनं विजयावर शिक्कामोर्तब केले होते.
Ranji Trophy 2022: सचिनच्या अर्जुनला मोठी संधी, मुंबईच्या टीममध्ये झाली निवड
वन-डे आणि टी20 इंटरनॅशनलचाही टेलरला मोठा अनुभव आहे. त्याने 233 वन-डेमध्ये 48.20 च्या सरासरीनं 8581 रन केले आहेत. यामध्ये 21 शतक आणि 51 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, 102 टी 20 इंटरनॅशनलमध्ये 7 अर्धशतकासह 1909 रन टेलरच्या नावावर आहेत. या प्रकारात त्यानं 26.15 च्या सरासरीनं रन केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, New zealand