वादग्रस्त सामन्यात वर्ल्डकप विजेतेपद गमावलेल्या न्यूझीलंड संघाचा झाला सर्वोच्च गौरव!

वादग्रस्त सामन्यात वर्ल्डकप विजेतेपद गमावलेल्या न्यूझीलंड संघाचा झाला सर्वोच्च गौरव!

न्यूझीलंड संघाने वर्ल्डकप जिंकला नाही पण खेळ भावाना जपल्याबद्दल मिळाला सर्वोच्च पुरस्कार...

  • Share this:

हॅमिल्टन, 04 डिसेंबर: क्रिकेट वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात वादग्रस्त ठरलेल्या यावेळीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने विजेतेपद मिळवले. इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंड संघाचा पराभव झाला. या वादग्रस्त सामन्यात पराभव झाल्यानंतर देखील शानदार खेळ भावना दाखवल्याबद्दल न्यूझीलंडच्या संघाचा गौरव करण्यात आला आहे. न्यूझीलंड (New zealand)संघाला ख्रिस्टोफर मार्टिन-जेनकिन्स स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार देण्यात आला आहे. केन विल्यमसन (Kane Williamson)आणि संघाला वर्ल्डकप जिंकता आला नाही. पण त्यांनी केलेल्या खेळाचे सर्वांनी कौतुक केले.

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावरील अंतिम सामन्यात (England vs New Zealand)एका ओव्हर थ्रोमुळे इंग्लंडच्या संघाला सहा अतिरिक्त धावा मिळाल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि सुपर ओव्हरमधील सामना टाय झाल्याने सर्वाधिक चौकार कोणी मारले या आधारावर इंग्लंडला विजेतेपद देण्यात आले होते.

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात हॅमिल्टनमधील सेंडन पार्क येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्या दरम्यान यजमान संघाला हा पुरस्कार देण्यात आला. एमसीसीचे अध्यक्ष कुमार संगकाराने न्यूझीलंड संघाचे कौतुक केले. न्यूझीलंडचा संघ खऱ्या अर्थाने या पुरस्काराचा मानकरी आहे. अंतिम सामन्यात इतका तणाव असताना देखील न्यूझीलंडच्या संघाने खेळ भावनेला सर्वोच्च स्थान दिल्याचे संगकारा म्हणाला.

अंतिम सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला 242 धावांचे आव्हान दिले होते. अखेरच्या षटकात इंग्लंडला 3 चेंडूत 9 धावांची गरज होती. मार्टिन गुप्टिलने केलेला थ्रो बेन स्टोक्सच्या बॅटला लागून सीमेच्या पलीकडे गेला आणि अंपायरने इंग्लंडला 6 धावा दिल्या. या निर्णयानंतर सामना टाय झाला. सुपर ओव्हरमध्ये देखील पुन्हा सामना टाय झाल्याने सर्वाधिक चौकार मारणाऱ्या संघ म्हणून इंग्लंडा विजेतेपद देण्यात आले. अंतिम सामन्यानंतर क्रिकेटमधील या नियमावर अनेकांनी टीका केली होती. त्यानंतर या नियमात बदल करण्यासंदर्भात आयसीसी विचार करत आहे.

एमसीसीचे माजी अध्यक्ष आणि बीबीसीचे कसोटी सामन्यासाठीचे समालोचक मार्टिन-जेनकिन्स यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2019 01:03 PM IST

ताज्या बातम्या