मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

...तर देशातून हाकलून देऊ, न्यूझीलंड सरकारचा पाकिस्तानी टीमला इशारा

...तर देशातून हाकलून देऊ, न्यूझीलंड सरकारचा पाकिस्तानी टीमला इशारा

न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान (New Zealand vs Pakistan) क्रिकेट टीमच्या सहा खेळाडूंना कोरोना (Corona Virus) ची लागण झाली आहे. पाकिस्तानचे खेळाडू कोरोनाबाबतच्या नियमांचं पालन करत नसल्याचा प्रकार समोर आलं आहे.

  • Published by:  Shreyas

ऑकलंड, 27 नोव्हेंबर : न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान (New Zealand vs Pakistan) क्रिकेट टीमच्या सहा खेळाडूंना कोरोना (Corona Virus) ची लागण झाली आहे. पाकिस्तानचे खेळाडू कोरोनाबाबतच्या नियमांचं पालन करत नसल्याचा प्रकार समोर आलं आहे. पाकिस्तानी खेळाडूंनी आता एकदा जरी नियम मोडला तर त्यांना पुन्हा पाकिस्तानला पाठवलं जाईल, असा इशारा न्यूझीलंड सरकारने दिला आहे, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसीम खान यांनी दिली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

वसीम खान यांनी पाकिस्तानी टीमला व्हॉट्सऍप व्हॉईस मेसेज पाठवला आहे. 'न्यूझीलंड सरकारशी मी बोललो आहे, त्यांनी टीमने तीन ते चार वेळा नियम तोडल्यांचं सांगितलं आहे आणि आपल्याला शेवटची ताकीदही देण्यात आली आहे. हा तुमच्यासाठी कठीण काळ आहे. इंग्लंडमध्येही तुम्हाला याच परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. या गोष्टी सोप्या नसल्या तरी आपल्या देशाचा मान आणि विश्वासार्हतेचा मुद्दा आहे. या 14 दिवसानंतर तुम्हाला हॉटेलमध्ये जायचं आणि फिरण्याचं स्वातंत्र्य मिळेल. पण आता तुम्ही नियम मोडलात तर आपल्याला पुन्हा पाकिस्तानला पाठवलं जाईल,' असं वसीम खान म्हणाले.

न्यूझीलंड दौऱ्यामध्ये पाकिस्तानची टीम तीन टी-20 आणि दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. न्यूझीलंड सरकारच्या विशेष परवानगीने पाकिस्तानची टीम चार्टर विमानाने ऑकलंडमध्ये दाखल झाली. यानंतर 14 दिवसांच्या क्वारंटाईनसाठी त्यांना क्राईस्टचर्चला नेण्यात आलं, पण तिकडेच पाकिस्तानचे सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. लाहोरवरून निघताना करण्यात आलेल्या कोरोना टेस्टमध्ये खेळाडूंचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा दावा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला. कोरोना झालेल्या पाकिस्तानच्या सहा खेळाडूंना वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे.

न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकांनीही पाकिस्तानच्या टीमला इशारा दिला आहे. न्यूझीलंडमध्ये खेळण्यासाठी येणं हा मान आहे, पण त्याबदल्यात टीमनी नियम पाळलेच पाहिजेत. हे नियम कोरोनाला समाजाच्या बाहेर ठेवण्यासाठी बनवण्यात आले आहेत, असं आरोग्य विभागाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर ऍशले ब्लूमफिल्ड म्हणाले. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानेही पाकिस्तानी खेळाडू कोरोनाबाबतचे नियम पाळत नसल्याचं प्रसिद्धी पत्रक काढलं आहे.

First published: