मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

प्रेरणादायक! पायाची दोन बोटं तुटली असूनही न्यूझीलंडच्या खेळाडूनं 49 ओव्हर्स केली बॉलिंग!

प्रेरणादायक! पायाची दोन बोटं तुटली असूनही न्यूझीलंडच्या खेळाडूनं 49 ओव्हर्स केली बॉलिंग!

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात झालेली बॉक्सिंग डे (Boxing Day) टेस्ट न्यूझीलंडनं जिंकली. या मॅचमध्ये न्यूझीलंडचा फास्ट बॉल नील वॅगनरनं ((Neil Wagner)  जबरदस्त लढाऊ वृत्तीचं दर्शन जगाला दाखवलं.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 31 डिसेंबर : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात झालेली बॉक्सिंग डे (Boxing Day) टेस्ट न्यूझीलंडनं जिंकली. या मॅचमध्ये न्यूझीलंडचा फास्ट बॉलर नील वॅगनरनं ((Neil Wagner)  जबरदस्त लढाऊ वृत्तीचं दर्शन जगाला दाखवलं. वॅगनरच्या या लढाऊ वृत्तीची न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) आणि पाकिस्तानचा कॅप्टन (Mohammad Rizwan) यांनी प्रशंसा केली आहे. वॅगनरला काय झालं होतं? नील वॅगनर बॅटींग करत असताना त्याच्या पायाला पाकिस्ताचा फास्ट बॉलर शाहीन आफ्रिदीचा बॉल लागला. आफ्रिदीचा यॉर्कर थेट पायावर बसल्यानं त्याच्या पायाची दोन बोटं तुटली. त्यानंतरही तो जिद्दीनं तीन दिवस खेळला. वॅगनरनं दुसऱ्या इनिंमध्येही बॉलिंग करत दोन विकेट्स घेतल्या. यामध्ये पाकिस्तानकडून सेंच्युरी करणाऱ्या फवाद आलमच्या विकेटचाही समावेश आहे. फवाद आऊट झाल्यानंतर  पाकिस्तानवर दबाव वाढला. अखेर पाचव्या दिवसाचा 4.3 ओव्हर्सचा खेळ शिल्लक असताना न्यूझीलंडनं पाकिस्तानचा पराभव करत 1-0 अशी आघाडी घेतली. 'वॅगनर वेडा आहे' पाकिस्तानचा कॅप्टन मोहम्मद रिझवान यानं वॅगनरच्या लढाऊ वृत्तीला दाद दिली आहे. “ मी केन विल्यमसनला म्हणातो की, तो (वॅगनर) वेडा आहे. न्यूझीलंडला त्याचा अभिमान असेल. त्यानं आक्रमक बॉलिंग केली.’’ केन विल्यमसननही त्याची प्रशंसा केली आहे. “तो मैदानाच्या बाहेर जावून वेदना कमी करण्यासाठी इंजेक्शन घेत होता. या त्रासानंतरही त्यानं बॉलिंग केली.  हे आमच्यासाठी विलक्षण दृश्य होते. त्याची खेळण्याची तीव्र इच्छाशक्ती आणि टीमसाठी चांगली कामगिरी करण्याची जिद्द ही मोठी गोष्ट आहे,” या शब्दात विल्यमसननं त्याच्या सहकाऱ्याची प्रशंसा केली आहे. दुसऱ्या टेस्टमधून आऊट नील वॅगनर या दुखापतीमुळे या मालिकेतील दुसऱ्या टेस्टमधून आऊट झाला आहे. या मालिकेतील दुसरी आणि शेवटची टेस्ट 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. पहिली टेस्ट जिंकल्यानंतर  न्यूझीलंडची टीम पहिल्यांदाच आयसीसी टेस्ट क्रमवारीत (ICC Test Ranking) पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. 2020 या वर्षातला न्यूझीलंडचा हा सलग पाचवा विजय होता.
First published:

Tags: Cricket

पुढील बातम्या