मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /सचिन-द्रविडची विकेट घेणाऱ्या बॉलरवर आली होती लोकांकडं पैसे मागण्याची वेळ

सचिन-द्रविडची विकेट घेणाऱ्या बॉलरवर आली होती लोकांकडं पैसे मागण्याची वेळ

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), राहुल द्रविड (Rahul Dravid), वीरेंद्र सेहवाग आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण या दिग्गज बॉलरला आऊट करणाऱ्या क्रिकेटपटून लोकांकडे पैसे मागण्याची वेळ आली होती.

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), राहुल द्रविड (Rahul Dravid), वीरेंद्र सेहवाग आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण या दिग्गज बॉलरला आऊट करणाऱ्या क्रिकेटपटून लोकांकडे पैसे मागण्याची वेळ आली होती.

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), राहुल द्रविड (Rahul Dravid), वीरेंद्र सेहवाग आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण या दिग्गज बॉलरला आऊट करणाऱ्या क्रिकेटपटून लोकांकडे पैसे मागण्याची वेळ आली होती.

मुंबई, 10 जुलै : सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), राहुल द्रविड (Rahul Dravid), वीरेंद्र सेहवाग आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हे चार जण भारताचेच नाही तर जगातील बेस्ट बॅट्समन मानले जातात. त्यांनी एकट्याच्या जीवावर अनेक मॅच जिंकून दिल्या आहेत. या चार दिग्गजांना आऊट करणाऱ्या एका बॉलरची आर्थिक परिस्थिती इतकी खराब झाली होती की त्याच्यावर लोकांना पैसे मागण्याची वेळ आली होती.

या फास्ट बॉलरचं नाव आहे इयन ओ ब्रायन. तो न्यूझीलंडचा फास्ट बॉलर आहे. त्याचा आज वाढदिवस असून (Iain O'Brien Birthday) 1976 साली त्याचा वेलिंग्टनमध्ये जन्म झाला. ओ ब्रायन आता इंग्लंडमध्ये स्थायिक झाला आहे. तो गेल्या वर्षी काही कामासाठी न्यूझीलंडमध्ये आला होता. तितक्यात कोरोना व्हायरसचा धोका जगभर वाढला. त्यामुळे त्याचे विमान तीन वेळा रद्द झाले. न्यूझीलंडने इतर देशांसाठी बॉर्डर बंद केली. त्यामुळे तो कुटुंबापासून दूर वेलिंग्टनमध्येच अडकला.

तीन वेळा विमान रद्द झाल्यानंतर ओ ब्रायनला चौथ्यांदा तिकीट खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते. त्यावेळी त्याने सोशल मीडियावर एक भावुक संदेश करत लोकांना पैसे देण्याचं आवाहन केले. 'मी न्यूझीलंडमध्ये आलो आहे. मला माझ्या पत्नीकडे जायचं आहे. तिला फुफ्फुसाचा आजार आहे. कोरोना व्हायरसमुळे तिचा जीव जाऊ शकतो.'  ओब्रायनचे लक्ष्य हे 2250 पाऊंड जमा करणे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्यांच्या अकाऊंटमध्ये 3660 पाऊंड जमा झाले होते. त्यामुळे गहिरवलेल्या ओ ब्रायनने लोकांचे आभार मानले. आपल्या अकाऊंटमध्ये इतके पैसे पाहून अश्रू अनावर झाल्याची भावना त्याने व्यक्त केली.

पाकिस्तानची पुन्हा फजिती, फास्ट बॉलरला इंग्लंडहून जबरदस्तीनं घरी पाठवलं

ओ ब्रायनची कारकिर्द

ओ ब्रायननं भारताच्या विरुद्ध 2009 साली टेस्ट सीरिज खेळली होती. त्या सीरिजमध्ये त्याने 9 विकेट्स घेतल्या. यामध्ये सचिन, द्रविड, सेहवाग, लक्ष्मण या दिग्गजांना त्याने आऊट केले. ओब्रायनने 22 टेस्टमध्ये 73, 10 वन-डे मध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत.

First published:

Tags: Cricket news, New zealand, Rahul dravid, Sachin tendulakar