न्यूझीलंड क्रिकेटचा धक्कादायक निर्णय, सर्वाधिक टी-20 खेळलेल्या दिग्गजालाच काढलं टीमबाहेर

न्यूझीलंड क्रिकेटचा धक्कादायक निर्णय, सर्वाधिक टी-20 खेळलेल्या दिग्गजालाच काढलं टीमबाहेर

पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी न्यूझीलंड (New Zealand vs Pakistan) ने टीमची घोषणा केली आहे. न्यूझीलंडने 18 सदस्यांच्या या टीममध्ये दिग्गज खेळाडू रॉस टेलर (Ross Taylor) याला टीमबाहेर काढलं आहे.

  • Share this:

ऑकलंड, 13 डिसेंबर : पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी न्यूझीलंड (New Zealand vs Pakistan) ने टीमची घोषणा केली आहे. न्यूझीलंडने 18 सदस्यांच्या या टीममध्ये दिग्गज खेळाडू रॉस टेलर (Ross Taylor) याला टीमबाहेर काढलं आहे. तर केन विलियमसन (Kane Wiliamson) पितृत्वाच्या रजेवर गेल्यामुळे तो दुसऱ्या आणि तिसऱ्या मॅचमध्ये खेळणार आहे. 36 वर्षांच्या रॉस टेलरशिवाय फास्ट बॉलर लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे खेळणार नाही. शुक्रवारी ऑकलंडमधून या सीरिजला सुरुवात होणार आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये विश्रांती देण्यात आलेला ट्रेन्ट बोल्ट, तसंच टीम साऊदी काईल जेमिनसन आणि डॅरेल मिचल यांचीदेखील दुसऱ्या आणि तिसऱ्या मॅचसाठी निवड झाली आहे. फास्ट बॉलर ब्लेयर टिकनर, बॅट्समन मार्क चॅपमन आणि ऑलराऊंडर डग ब्रेसवेल फक्त पहिली टी-20 साठी असणार आहेत.

18 डिसेंबरपासून न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातल्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. पहिली मॅच ऑकलंडमध्ये, दुसरी हॅमिल्टनमध्ये आणि तिसरी नेपियरमध्ये खेळवली जाईल.

रॉस टेलर याचा फॉर्म इतर खेळाडूंच्या तुलनेत चांगला नसल्यामुळे त्याला बाहेर ठेवण्यात आलं असल्याची प्रतिक्रिया निवड समिती सदस्य गेव्हिन लार्सन यांनी दिली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या टी-20 मॅचमध्ये टेलर 38 रनवर आऊट झाला होता. रॉस टेलर हा न्यूझीलंडकडून सगळ्यात जास्त टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळणारा खेळाडू आहे. टेलरने 102 आंतरराष्ट्रीय टी-20 मॅचमध्ये 26.15 च्या सरासरीने 1,909 रन केले आहेत.

न्यूझीलंडची टीम

पहिली टी-20

मिचेल सॅन्टनर (कर्णधार), टॉड एस्टल, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेवोन कॉनवे, जेकब डफी, मार्टिन गप्टील, स्कॉट कुगलेईजन, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, टीम सायफर्ट, इश सोदी, ब्लेयर टिकनर

दुसरी आणि तिसरी टी-20

केन विलियमसन (कर्णधार), टॉड एस्टल, ट्रेन्ट बोल्ट, डेवॉन कॉनवे, मार्टिन गप्टील, काईल जेमिसन, स्कॉट कुगलेईजन, डॅरेल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, टीम सायफर्ट, इश सोदी, टीम साऊथी

Published by: Shreyas
First published: December 13, 2020, 3:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या