Home /News /sport /

WTC Final मधील जखमेनंतर न्यूझीलंडचे मलम, भारतीय फॅन्सना दिली Good News

WTC Final मधील जखमेनंतर न्यूझीलंडचे मलम, भारतीय फॅन्सना दिली Good News

न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. टीम इंडियाचा पराभव करणाऱ्या न्यूझीलंडनं भारतीय फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.

    मुंबई, 26 जून : न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. साऊथम्पटनमध्ये झालेल्या फायनल मॅचमध्ये पावसाचा अडथळा आला. पण अखेरीस शेवटच्या दिवशी न्यूझीलंडनं जोरदार खेळ करत विजेतेपद पटकावले. या पराभवामुळे टीम इंडियाची ICC स्पर्धेतील विजेतेपदाची प्रतीक्षा लांबली आहे. टीम इंडियाचा पराभव करणाऱ्या न्यूझीलंडनं भारतीय फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. एका रिपोर्टनुसार सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या (IPL 2021) उत्तरार्धासाठी न्यूझीलंडचे खेळाडू उपलब्ध असतील. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे आयपीएल स्पर्धा यापूर्वी स्थगित करावी लागली होती. आता स्पर्धेतील उर्वरित 31 सामने यूएईमध्ये होणार आहेत. आयपीएल स्पर्धेसाठी एप्रिल आणि मे महिन्यात विशेष जागा असल्यानं सर्व देशांच्या क्रिकेट बोर्डानं खेळाडूंना खेळण्याची परवानगी दिली होती. मात्र आता स्पर्धा सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात होणार असल्यानं विदेशी खेळाडूंच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. इंग्लंड बोर्डानं यापूर्वीच त्यांचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तर, ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा सहभाग देखील अनिश्चित आहे. ‘क्रिकेट डॉट कॉम’ ने दिलेल्या वृत्तानुसार न्यूझीलंडचे खेळाडू आयपीएल स्पर्धेच्या उत्तरार्धात खेळण्यासाठी उपलब्ध असतील. या निर्णयामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाल्याची माहिती एका फ्रँचायझी अधिकाऱ्यानं दिल्याचं या वृत्तामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. बीसीसीआयची ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी बोलणी सुरू आहे, पण न्यूझीलंडचे खेळाडू स्पर्धेत खेळणार असल्याचं आम्हाला समजलं आहे, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं. ‘विराटला काढा आणि रोहित शर्माला कॅप्टन करा’, माजी क्रिकेटपटूची मागणी दिग्गज खेळाडूंचा समावेश न्यूझीलंडच्या केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट, काइल जेमिसन, लॉकी फर्ग्यूसन, जिमी नीशम, मिचेल सँटनर आणि टीम सेफर्ट हे सात दिग्गज खेळाडू वेगवेगळ्या आयपीएल टीमचे सदस्य आहेत. न्यूझीलंड क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात फारसे व्यस्त नाही. त्यामुळे या खेळाडूंना आयपीएल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अडचण नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BCCI, Cricket news, IPL 2021, New zealand

    पुढील बातम्या