• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • मृत्यूच्या दारातून परतला दिग्गज क्रिकेटपटू, VIDEO शेअर करत म्हणाला...

मृत्यूच्या दारातून परतला दिग्गज क्रिकेटपटू, VIDEO शेअर करत म्हणाला...

न्यूझीलंडचा माजी ऑल राऊंडर ख्रिस क्रेन्स (Chris Cairns) मृत्यूच्या दारातून परतला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या हार्टचं एक अत्यंत अवघड ऑपरेशन झालं होतं. या ऑपरेशननंतर क्रेन्स पहिल्यांदाच जगासमोर आला.

 • Share this:
  मुंबई, 20 सप्टेंबर : न्यूझीलंडचा माजी ऑल राऊंडर ख्रिस क्रेन्स (Chris Cairns) मृत्यूच्या दारातून परतला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या हार्टचं एक अत्यंत अवघड ऑपरेशन झालं होतं. या ऑपरेशननंतर क्रेन्स पहिल्यांदाच जगासमोर आला. त्यानं एका व्हिडीओ मेसेजच्या माध्यमातून सर्व फॅन्सना धन्यवाद दिलं आहे. मी भाग्यवान आहे, पण अजून खूप मोठा प्रवास बाकी असल्याचं त्यानं यावेळी सांगितलं. क्रेन्सनं या व्हिडीओमध्ये त्याच्या आजाराबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्याला 6 आठवड्यापूर्वी टाइप-ए-एओर्टिक डाइसेक्शनचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याच्या ऱ्हदयातील धमन्या बिघडल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर अनेक ऑपरेशन करावी लागली. या ऑपरेशननंतर अनेक गुंतागुतीचे प्रश्न निर्माण झाल्याचं क्रेन्सनं सांगितलं. यामध्ये पॅरेलिसिस होण्याचा देखील  होता. कॅनबेरातील हॉस्पिटलची टीम, डॉक्टर्स, नर्स तसंच या क्षेत्रातील एक्स्पर्टसे त्यानं जीव वाचवल्याबद्दल आभार मानले आहेत. तसंच जगभरातील फॅन्सनी मेलच्या तसंच माझ्या पत्नीच्या माध्यमातून मला शूभसंदेश पाठवला. त्याबद्दलही मी विनम्र असेल, असं क्रेन्स यावेळी म्हणाला. क्रेन्सची कारकिर्द ख्रिस क्रेन्सनं 1989 ते 2006 या कालावधीमध्ये 62 टेस्ट, 215 वन-डे आणि 2 आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2000 साली केनियामध्ये झालेली पहिली मिनी वर्ल्ड कप स्पर्धा क्रेन्सच्या शतकाच्या जोरावरच न्यूझीलंडनं भारताता पराभव करुन जिंकली होती. त्याच्या काळातील दिग्गज ऑल राऊंडरमध्ये क्रेन्सचा समावेश होता. त्याचे वडील लान्स क्रेन्स हे देखील न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. सचिनच्या पावलावर विराटचं पाऊल, 3 दिवसांमध्ये घेतले 2 मोठे निर्णय ख्रिस क्रेन्स इंडियन क्रिकेट लीग (ICL) या क्रिकेट स्पर्धेतही खेळला होता. तसेच त्यानंतरच्या काळात त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोपही झाले. या प्रकरणात 2015 साली कोर्टानं त्याची निर्दोष मुक्तता केली. सध्या तो एका स्पोर्ट्स कंपनीमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत आहे.
  Published by:News18 Desk
  First published: