Home /News /sport /

9 दिवसांत झाल्या 4 ओपन हार्ट सर्जरी, 'त्या' आठवणी सांगताना दिग्गज क्रिकेटपटू भावुक

9 दिवसांत झाल्या 4 ओपन हार्ट सर्जरी, 'त्या' आठवणी सांगताना दिग्गज क्रिकेटपटू भावुक

न्यूझीलंडच्या (New Zealand) माजी ऑल राऊंडरला आपण जगू याची खात्री वाटली नव्हती. आपण जिवंत आहोत, हीच खूप मोठी गोष्ट असल्याचं त्यानं म्हंटलं आहे.

    मुंबई, 4 डिसेंबर : न्यूझीलंडचा माजी ऑल राऊंडर ख्रिस क्रेन्सला (Chris Cairns) आपण जगू याची खात्री वाटली नव्हती. आपण जिवंत आहोत, हीच खूप मोठी गोष्ट असल्याचं त्यानं म्हंटलं आहे. तीन महिन्यांपूर्वी त्याची हार्ट सर्जरी झाली होती. त्यानंतर त्याचे अनेक ऑपरेशन झाले. त्या दरम्यान या क्रिकेटपटूची तब्येत अत्यंत गंभीर झाली होती. या दरम्यान दोन स्पाइन स्ट्रोक आल्यानं त्याच्या शरिराचा खालचा भाग लकवाग्रस्त झाला आहे. या सर्व  गंभीर आघातानंतरही क्रेन्सनं जिद्द सोडली नसून तो या सर्वावर मात करत सामान्य आयुष्य पुन्हा एकदा जगण्याचा प्रयत्न करत आहे. ख्रिस क्रेन्स सध्या ऑस्ट्रेलियाताील कॅनबेरा विद्यापीठाच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.  न्यूझीलंडमधील एका वेबसाईटशी बोलताना त्याने त्याचे अनुभव सांगितले. 'मी पुन्हा चालू शकेल का हे मला माहिती नाही. मी परिस्थिती स्विकारली आहे. आता व्हिलचेअरच्या मदतीनं आनंदी आयुष्य जगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अर्थात याची सवय होण्यासाठी थोडा वेळ लागेल. माझ्या आजारपणाला 14 आठवडे झाली आहेत. पण, मागे वळून पाहताना मी हे संपूर्ण आयुष्यभर सहन करत आहे, असं मला वाटतं. मला त्या 8-9 दिवसांमधील काहीही आठवत नाही. माझ्या चार ओपन हार्ट सर्ज झाल्या आहेत.' असं क्रेन्सनं सांगितलं. भारतीय खेळाडूचा क्लीन बोल्ड झाल्यानंतरही मैदानातून जाण्यास नकार, थर्ड अंपायरकडे मागितली दाद क्रेन्सची कारकिर्द ख्रिस क्रेन्सनं 1989 ते 2006 या कालावधीमध्ये 62 टेस्ट, 215 वन-डे आणि 2 आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2000 साली केनियामध्ये झालेली पहिली मिनी वर्ल्ड कप स्पर्धा क्रेन्सच्या शतकाच्या जोरावरच न्यूझीलंडनं भारताता पराभव करुन जिंकली होती. त्याच्या काळातील दिग्गज ऑल राऊंडरमध्ये क्रेन्सचा समावेश होता. त्याचे वडील लान्स क्रेन्स हे देखील न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. ख्रिस क्रेन्स इंडियन क्रिकेट लीग (ICL) या क्रिकेट स्पर्धेतही खेळला होता. तसेच त्यानंतरच्या काळात त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोपही झाले. या प्रकरणात 2015 साली कोर्टानं त्याची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर तो एका स्पोर्ट्स कंपनीमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत  होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, New zealand

    पुढील बातम्या