• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • मोठी बातमी: टीम इंडियाचे नवे कोच राहुल द्रविड यांचा कॅप्टन पदासाठी रोहित शर्माला पाठिंबा

मोठी बातमी: टीम इंडियाचे नवे कोच राहुल द्रविड यांचा कॅप्टन पदासाठी रोहित शर्माला पाठिंबा

राहुल द्रविडची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती ((Rahul Dravid Team India Coach) करण्यात आली आहे. मर्यादीत ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून तुम्ही कुणाकडं पाहता? असा प्रश्न द्रविडला विचारण्यात आला होता.

 • Share this:
  मुंबई, 4 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यातील टी20 वर्ल्ड कप मॅच दरम्यान बीसीसीआयनं एक मोठी घोषणा केली. राहुल द्रविडची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती ((Rahul Dravid Team India Coach) करण्यात आली आहे. टीम इंडियाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ सध्या सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. द्रविड त्यांची जागा घेईल. 'इंडियन एक्स्प्रेस' मधील बातमीनुसार द्रविड यांना या पदाच्या मुलाखतीच्या दरम्यान एक खास प्रश्न विचारण्यात आला होता. मर्यादीत ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून तुम्ही कुणाकडं पाहता? असा प्रश्न द्रविडला विचारण्यात आला होता. त्यावेळी द्रविडनं त्याची पहिली पसंती रोहित शर्मा (Rohit Sharma) असल्याचं सांगितलं. द्रविडनं रोहितनंतर केएल राहुलचं (KL Rahul) नाव घेतलं. राहुल द्रविड याआधी टीम इंडियासोबत श्रीलंका दौऱ्यावर मुख्य प्रशिक्षक म्हणून गेला होता. भारताचे मुख्य खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे राहुल द्रविडला ही जबाबदारी देण्यात आली होती. टीम इंडियाचा पूर्णवेळ प्रशिक्षक होण्यासाठी द्रविड सुरुवातीला फारसा इच्छुक नव्हता, पण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी द्रविडला कोच होण्यासाठी तयार केलं, यानंतर त्याने या पदासाठी अर्ज भरला. टीम इंडियाचा कोच झालेल्या द्रविडची Diwali Bumper, रवी शास्त्रींपेक्षा मिळणार जास्त मानधन! टी20 प्रकारातील कॅप्टनसी सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड कपनंतर सोडण्याची घोषणा विराट कोहलीनं (Virat Kohli) यापूर्वीच केली आहे. त्याचबरोबर वन-डे टीमच्या कॅप्टनसीवरुनही त्याची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विराटच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध बीसीसीआयनं सुरू केला आहे. राहुल द्रविड कोच झाला असला तरी भारताचा बॉलिंग कोच, बॅटिंग कोच आणि फिल्डिंग कोच कोण होणार, याबाबत अजून घोषणा करण्यात आलेली नाही. सध्याचे टीम इंडियाचे बॅटिंग कोच विक्रम राठोड यांनीही या पदासाठी अर्ज केला आहे. तसंच राहुल द्रविडचे विश्वासू सहकारी पारस म्हांब्रे यांनी बॉलिंग कोचसाठी अर्ज केला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: