मुंबई, 25 मार्च : क्रिकेटमध्ये मागील बऱ्याच महिन्यांपासून भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आली नव्हती. परंतु हाती आलेल्या एका ताज्या रिपोर्टनुसार 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या तब्बल 13 कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट सामन्यांमध्ये सट्टेबाजी, मॅच-फिक्सिंग आणि भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्पोर्टडार इंटेग्रिटी सर्विसेसने हा रिपोर्ट जाहीर केला असून यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.
स्पोर्टडार इंटिग्रिटी सर्व्हिसेस युनिट ही काही तज्ञांची आंतरराष्ट्रीय टीम क्रिकेटमध्ये होणारी अनियमित सट्टेबाजी, मॅच-फिक्सिंग आणि खेळांमधील भ्रष्टाचाराच्या इतर प्रकारांचे विश्लेषण करते. त्यांनी 'बेटिंग, करप्शन अँड मॅच-फिक्सिंग' या 28 पानांच्या अहवालात म्हंटल्यानुसार 2022 मध्ये, 92 देशांमधील 12 क्रीडा शाखांमध्ये 1212 सामने संशयाच्या भोवऱ्यात आहेत. सामन्यांदरम्यान संशयास्पद गोष्टी शोधण्यासाठी कंपनी युनिव्हर्सल फ्रॉड डिटेक्शन सिस्टम (UFDS) या ऍप्लिकेशनचा वापर करते.
IPL 2023 : आयपीएलपूर्वी समोर आला विराट कोहलीचा नवा लूक!
स्पोर्टडार इंटिग्रिटी सर्व्हिसेस युनिटच्या अहवालानुसार जगभरात फुटबॉलमध्ये 775 सामने होते, ज्यांच्यात भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. भ्रष्टाचार झालेल्या क्रीडा प्रकारांच्या यादीत बास्केटबॉल 220 संशयित सामन्यांसह दुसऱ्या स्थानी असून तर लॉन टेनिसच्या 75 सामन्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. तर 12 क्रीडा प्रकारांपैकी क्रिकेटच्या 13 सामन्यांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे बोलले जात आहे. परंतु चांगलीबाब म्हणजे 13 संशयित सामन्यांपैकी एकही सामना भारतात खेळवला न गेल्याचा अंदाज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Sports