मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'मला 'या' बाबतीत राहुल द्रविड मदत करेल', कॅप्टन झाल्यानंतर रोहित शर्माला विश्वास

'मला 'या' बाबतीत राहुल द्रविड मदत करेल', कॅप्टन झाल्यानंतर रोहित शर्माला विश्वास

रोहित शर्मानं (Rohit Sharma) वन-डे टीमचा कॅप्टन म्हणून काम सुरू केलं आहे. आपल्याला एका बाबतीत हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) मदत करेल असा विश्वास त्यानं व्यक्त केला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 13 डिसेंबर : टीम इंडियाचा दिग्गज बॅटर रोहित शर्मा (Rohit Sharma) आता मर्यादीत ओव्हर्समधील भारतीय टीमचा कॅप्टन झाला आहे. आगामी काळात होणाऱ्या दोन वर्ल्ड कप स्पर्धा हे कॅप्टन रोहितसमोरचं मोठं आव्हान असेल. रोहितनं कॅप्टन म्हणून तयारी सुरू केली आहे. आपल्याला टीममधील एका बाबतीत हेड कोच राहुल द्रविड मदत करेल, असा विश्वास रोहितनं व्यक्त केला आहे.

रोहितनं कॅप्टन झाल्यानंतर 'बीसीसीआय डॉट टीव्ही'ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यानं टीममधील सदस्यांमध्ये भक्कम नातं निर्माण करण्यावर भर दिला आहे. टीमने बाहेरच्या गोष्टींची पर्वा खेळाडूंनी करू नये. खेळाडू एकमेंकांबद्दल काय विचार करतात हेच त्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहणार आहे, असे रोहितने स्पष्ट केले. खेळाडूंमधील नातं भक्कम होण्यासाठी  द्रविड मदत करेल असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.

'आम्हाला खेळाडूंमध्ये भक्कम नातं निर्माण करायचं आहे. त्यामुळे आम्हाला लक्ष्य गाठण्यात मदत होईल. त्यासाठी राहुल भाई (द्रविड) आम्हाला मदत करेल. मॅच जिंकण्यासाठी आम्हाला फोकस करायचा आहे. त्यासाठी ज्या गोष्टीसाठी खेळाडू ओळखले जातात तसा खेळ करणे आवश्यक आहे. माझ्या मते, बाहेरच्या गोष्टींना फार महत्त्व नाही. खेळाडू एकमेकांबद्दल काय विचार करतात हेच अखेर सर्वात महत्त्वाचे असते.

'भारताकडून खेळताना तुम्ही कायमच दबावात असतात. लोक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही गोष्टी बोलतील, पण माझा फोकस कायमच खेळावर असतो. लोक काय म्हणतात, त्याकडे मी लक्ष देत नाही, कारण या गोष्टी तुम्ही रोखू शकत नाही. सगळ्यात मोठी गोष्ट टीमला जाणून घेणं ही असते. मोठ्या स्पर्धांमध्ये लोक आणखी बोलतात.' असे रोहितने सांगितले.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ऋतुराज, अय्यरची जागा निश्चित, 17 शतकं ठोकणारा बाहेर!

टी20 वर्ल्ड कपनंतर भारतीय क्रिकेटमध्ये बदल झाले आहेत. त्यानुसार सुरूवातील रोहितला टी20 टीमचं पूर्णवेळ कॅप्टन करण्यात आले. त्याने नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंड विरुद्धची सीरिज 3-0 अशी जिंकत दमदार सुरूवात केली. आता पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या वन-डे सीरिजपासून तो या टीमचा पूर्णवेळ कॅप्टन असेल.

First published:

Tags: Cricket news, Rahul dravid, Rohit sharma, Team india