नवदीपचा विंडीजला दणका, गंभीर 2 दिग्गज माजी क्रिकेटपटूंवर भडकला!

विंडीज विरुद्धच्या टी 20 मालिकेतून भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीनं पदार्पण केलं.

News18 Lokmat | Updated On: Aug 3, 2019 10:48 PM IST

नवदीपचा विंडीजला दणका, गंभीर 2 दिग्गज माजी क्रिकेटपटूंवर भडकला!

मुंबई, 03 ऑगस्ट : अमेरिकेत सुरू असलेल्या विंडीजविरुद्धच्या मालिकेत भारताच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांची दाणादाण उडाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण कऱणाऱ्या नवदीप सैनीने पहिल्याच सामन्यात दोन विकेट घेतल्या. त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर 2 दिग्गज माजी क्रिकेटपटूंवर भडकला. गंभीरने दिग्गज फिरकीपटू बिशन सिंग बेदी आणि फलंदाजी चेतन चौहान यांना ट्विटरवरूव सुनावलं.

सैनीने पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात एका षटकात लागोपाठ दोन गडी बाद केले. त्याने निकोलस पूरन आणि शिम्रॉन हेटमायर यांना बाद करून विंडीजला डबल धक्का दिला. गेल्या तीन वर्षांपासून आयपीएल गाजवणाऱ्या सैनीने राष्ट्रीय संघात स्थान मिळण्यासाठी दावा केला होता.

गंभीरने ट्विटमध्ये लिहलं आहे की, भारताकडून पदार्पण करणाऱ्या सैनीचं अभिनंदन, त्यानं पहिला चेंडू टाकण्याआधीच बिशन बेदी आणि चेतन चौहान यांना बाद केलं होतं. ज्या खेळाडूनं मैदानावर पाऊल टाकण्याआधीच त्याचं क्रिकेट करिअर संपल्याचं म्हटलं होतं त्यानंच आता तुमची झोप उडवली. तुम्हाला लाज वाटली पाहिजे अशा शब्दात गंभीरने ट्विट केलं आहे.

नवदीप सैनीच्या करिअरच्या सुरुवातीला गंभीरने मदत केली आहे. दिल्लीचा नसल्यानं त्याला खेळण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. तेव्हा दिल्ली क्रिकेटशी बोलून गंभीरने प्रयत्न केले होते. नवदीपने दिल्ली जिल्ही क्रिकेट संघाच्या कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता. तेव्हा त्याच्या बाजूने गंभीर उभा राहिला होता.

Loading...

नवदीपने गंबीरचा विश्वास सार्थ ठरवत घरेलू क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्याची निवड 2017 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर नेट अभ्यासात खेळाडूंना गोलंदाजीसाठी करण्यासाठी झाली. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी निवड झाली होती.

भावी मुख्यमंत्री सेनेचा? पाहा काय आहे आदित्य ठाकरेंच्या मनात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 3, 2019 09:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...