'काश्मीरच्या लोकांसाठी मी आनंदी', भारताच्या युवा क्रिकेटपटूनं केलं ट्वीट

Article 370 : केंद्र सरकारने धाडसी निर्णय घेत काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं घटनेतलं 370वं कलम हटवलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 02:50 PM IST

'काश्मीरच्या लोकांसाठी मी आनंदी', भारताच्या युवा क्रिकेटपटूनं केलं ट्वीट

गयाना, 06 ऑगस्ट : काश्मीरमधील कलम 370 चा प्रश्न निकालात काढण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने सोमवारी घेतला. या निर्णयानंतर देशातील लोक आनंद साजरा करत आहेत. अनेक दिग्गजांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. काही खेळाडूंनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीर मुद्द्यावरून भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि पाकचा अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी एकमेकांना भिडले होते.

सध्या भारताचा संघ विंडीज दौऱ्यावर असून युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीनं काश्मीरमधील 370 कलम हटवल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. सैनीने सरकारच्या निर्णयानं जम्मू काश्मीरमधील लोकांसाठी मी आनंदी आहे असं म्हटलं आहे. तिथले लोक आता आरामात जगू शकतील. स्वातंत्र्यानंतर 71 वर्षांनी झालेल्या या निर्णयाला मोकळ्या मनानं आणि कोणत्याही पूर्वग्रहांशिवाय स्वीकारलं पाहिजे. काश्मीरच्या निर्णयासाठी पंतप्रधानांचे आभारही सैनीनं मानले आहेत.

खासदार गौतम गंभीर यांनी, सरकारच्या 370कलम हटवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच, "जे कोणीच करू शकलं नाही ते आपण करून दाखवलं. काश्मीरमध्ये आपण तिरंगा फडकवला. जय हिंद काश्मीर मुबारक!", असे ट्वीट केले.

वाचा-असं आहे PoK : पाकिस्तान ज्याला 'आझाद काश्मीर' म्हणतं ते आहे इतकं सुंदर!

तसेच, सुरेश रैनाने केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत, "कलम 370 हटवण्याचा निर्णय हा मोठा आहे. आता फक्त कश्मीरमध्ये चांगला काळ येऊ देत, अशी मी आशा करता", असे ट्वीट केले.

वाचा-जम्मू आणि काश्मीरमध्ये आता होतील हे 10 मोठे बदल, 70 वर्षातला मोठा निर्णय

तर, माजी क्रिकेटर मोहम्मद कैफनं केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. कैफनं, "मी आशा करतो की या निर्णयामुळं शांती आणि प्रेम भावना वाढेल", असे सांगितले.

ऑलिम्पिक माजी खेळाडू आणि माजी खासदार राजवर्धन सिंह राठोड यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत, काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानांसाठी ही खुप मोठी श्रध्दांजली आहे", असे ट्वीट केले.

वाचा-PHOTO : काश्मीरच्या निर्णयाबदद्ल फाडले कपडे तर दुसरीकडे जल्लोष

दरम्यान, घटनेतलं हे कलम हटविणं हा जनसंघापासून भाजपचा अजेंडा होता. त्यामुळे आता गेली अनेक वर्ष दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याचा दावा भाजप करणार आहे. स्वातंत्र्यानंतर 370 कलम काश्मीरमध्ये लागू करण्यात आलं होतं. राज्याला देण्यात आलेल्या विशेष अधिकारामुळं राष्ट्रपतींना राज्याची घटना बरखास्त करण्याचाही अधिकार नव्हता. देशात आर्थिक आणीबाणी लागू केली तरी ती काश्मीरमध्ये मात्र लागू होत नव्हती . भारतातील इतर राज्यांत लागू झालेले कायदेही इथं लागू करता येत नव्हते. आता हे सगळच बदलणार आहे.

VIDEO: तो एक क्षण आणि थोडक्यात बचावले मुख्यमंत्री!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 6, 2019 02:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...