मुंबई, 17 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय क्रिकेट टीम युएईमधूनच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय टीम वनडे, टी-20 आणि टेस्ट सीरिज खेळणार आहे. या दौऱ्याच्या वेळापत्रकाची अजून अधिकृत घोषणा झाली नसली, तरी आधीच टीम इंडियाच्या खेळाडूंना दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी फास्ट बॉलर नवदीप सैनी (Navdeep Saini)ला संधी मिळण्याची शक्यता आहे. सैनीने 2019 साली मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं, पण अजूनही त्याला टेस्ट क्रिकेटमध्ये संधी देण्यात आलेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये सैनीचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) दुखापतग्रस्त आहेत. तर हार्दिक पांड्यानेही शस्त्रक्रियेनंतर बॉलिंग केलेली नाही. तसंच टेस्ट क्रिकेटमध्ये बॉलिंग करण्यासाठी पांडया अजून पूर्णपणे फिट नाही. हार्दिकने त्याच्या बॉलिंग ऍक्शनमध्ये बदल केला आहेत, आणि तो झहीर खानकडून प्रशिक्षण घेत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने दिलं आहे. इशांत आणि भुवनेश्वर संपूर्ण ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे.
भारताच्या पहिल्या फळीतल्या फास्ट बॉलरची दुखापत बघता मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह याच्याबरोबर नवदीप सैनीला ऑस्ट्रेलियातल्या टेस्ट सीरिजचं तिकीट मिळू शकतं. स्थानिक क्रिकेटमध्येही नवदीप सैनीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
नवदीप सैनीने 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 आणि वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. सैनीने 9 टी-20 मॅचमध्ये 13 विकेट आणि 5 वनडेमध्ये 5 विकेट घेतल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.