मुंबई, 22 नोव्हेंबर: पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) हा क्रिकेट विश्वास भन्नाट वेगासाठी ओळखला जातो. या वेगामुळेच त्याला 'रावळपिंडी एक्स्प्रेस' (Rawalpindi Express) हे नाव मिळालं. त्याचा रनअप हा देखील इतरांपेक्षा जास्त आणि अधिक लक्षवेधी होता. क्रिकेट विश्वात वेगाच्या जोरावर दहशत निर्माण करणारा शोएब अख्तर आता कधीही धावणार नाही. स्वत: शोएबनंच ही माहिती दिली आहे.
क्रिकेट फॅन्सना निराश करणारी ही माहिती शोएबनंच ट्विट करत दिली आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये लवकरच त्याच्या गुडघ्याचं ऑपरेशन होणार आहे. या ऑपरेशनसाठी शोएब लवकरच रवाना होणार असून त्यानंतर कधीही धावता येणार नाही, असं शोएबनं सांगितलं.
My running days are over as am leaving for total knee replacement in Australia Melbourne very soon . pic.twitter.com/1sO6dHESPJ
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 21, 2021
शोएब अख्तर हा त्याच्या यूट्यूब चॅनलवरील वेगवेगळ्या वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असतो. त्यामध्ये तो क्रिकेटमधील घडामोडींवर आणि विशेषत: पाकिस्तान क्रिकेट टीमच्या कामगिरीवर त्याची परखड मतं मांडतो. पाकिस्तानचे सरकारी चॅनल पीटीव्हीवरील अँकर नौमान नियाजशी त्याचा लाईव्ह शोमध्ये वाद झाला होता. त्यानंतर त्यानं त्या कार्यक्रमातच राजीनामा दिला. या प्रकरणामुळे पाकिस्तानात चांगलाच वाद झाला होता. अखेर नौमान नियाजनं अख्तरची माफी मागितली आहे.
अख्तरची कारकिर्द
शोएब अख्तरनं 2011 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानं पाकिस्तानसाठी 46 टेस्टमध्ये 25.69 च्या सरासरीनं 178 विकेट्स घेतल्या आहेत. 163 वन-डे मध्ये 24.97 च्या सरासरीनं त्याच्या नावावर 247 विकेट्स आहेत. तर 15 टी20 इंटरनॅशनलमध्ये त्यानं 22.73 च्या सरासरीनं 19 विकेट्स घेतल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Pakistan, Shoaib akhtar