मुंबई, 17 मार्च : एखादी मॅच किती कमी बॉलमध्ये जिंकता येते हे मुंबईच्या टीमनं बुधवारी दाखून दिलं. मुंबईनं वन-डे मॅच फक्त 4 बॉलमध्ये जिंकली आहे. (Mumbai team won the match in just 4 balls) बीसीसीआयने आयोजित केलेल्या वरिष्ठ महिला वन-डे चषक (Women's Senior ODI Cup ) स्पर्धेत मुंबईने नागालँड (Mumbai vs Nagaland) विरुद्ध हा पराक्रम केला आहे.
मुंबईने पहिल्यांदा बॉलिंग करताना नागालँडची संपूर्ण टीम फक्त 17 रन वर ऑल आऊट केली. मुंबईची कॅप्टन सायली सातघरे (Sayali Satghare) ही या ऐतिहासिक विजयाची मुख्य नायिका होती. सायलीने 8.4 ओव्हर्समध्ये फक्त 5 रन देत 7 विकेट्स घेतल्या. या मॅचमध्ये नागलँडच्या पहिल्या चार बॅटरसह सहा जणी शून्यावर आऊट झाल्या. तर एकाही बॅटरला दोन आकडी स्कोअर करता आला नाही. नागालँडतर्फे साबिराने सर्वात जास्त 9 रन केले.
मुंबईच्या सायलीला एम. दक्षिणीनं 2 तर एस. ठकोरनं 1 विकेट देत उत्तम साथ दिली. मुंबईच्या अचूक बॉलिंगपुढे नागलँडच्या खेळाडूंकडे कोणतेही उत्तर नव्हते. त्यांना 17 रन काढण्यासाठी 17. 4 ओव्हर्स म्हणजे 106 बॉल लागले.
मुंबईनं 18 रनचं टार्गेट फक्त 4 बॉलमध्येच पूर्ण केलं. इशा ओझनं 3 फोर सह नाबाद 13 रन काढले. तर वृषाली भगतने सिक्स मारत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. नागालँडनं या चार बॉलमध्येही एक नो बॉल टाकत अतिरिक्त रन दिला.
Mumbai Won by 10 Wicket(s) #NAGvMUM @Paytm #OneDay Scorecard:https://t.co/rCwhWxhPJe
— BCCI Women (@BCCIWomen) March 17, 2021
( वाचा : बॉलिवूडचा 'सिंबा' झाला विराटचा फॅन, सुपरहिट 'बॅटींग शो' पाहून म्हणाला... )
या स्पर्धेत नागालँडच्या निराशाजनक कामगिरीचं प्रदर्शन सुरू आहे. यापूर्वी मध्य प्रदेशने त्यांचा फक्त 16 बॉलमध्ये पराभव केला होता. बुधवारी तर त्यांनी त्यापेक्षाही निचांक गाठला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Indian women's team, Mumbai, Sports