असे रंगणार मुंबईच्या मैदानात 'T-20 लीग'चे सामने

असे रंगणार मुंबईच्या मैदानात 'T-20 लीग'चे सामने

२ जानेवारीला टी-२० लीगचं उद्घाटन होणार आहे. तर ४ जानेवारीपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. ४ ते ९ जानेवारी अशी ही लीग चालणार आहे.

  • Share this:

8डिसेंबर : मुंबई क्रिकेट असोसिएशननं गुरुवारी टी-२० लीगची घोषणा केली आहे. २ जानेवारीला टी-२० लीगचं उद्घाटन होणार आहे. तर ४ जानेवारीपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. ४ ते ९ जानेवारी अशी ही लीग चालणार आहे. मुख्य म्हणजे T-20 लीगचे सामने हे मुंबईत पार पडणार आहे.त्यामुळे मुंबईच्या अनेक खेळाडूंना आपलं नशीब अजमवायला मिळणार आहे.

एमसीएच्या या लीगमध्ये ६ टीम्स असणार आहेत. राऊंड रॉबीन पद्धतीनं ही स्पर्धा होणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक संघाची एकमेकांशी लढत होईल आणि दोन टॉप टीम्समध्ये अंतिम सामना रंगेल.

एमसीएचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं की, 'मुंबईत स्थानिक खेळाडू उत्कृष्ट आहेत परंतु त्यांना संधी मिळत नाही. या लीगच्या माध्यमातून त्यांना खेळण्याची उत्तम संधी मिळेल.'

T-20 लीग

T-20 लीग

ही लीग शहराच्या सहा झोनमध्ये विभाललेली आहे. ज्यात मुंबई-उत्तर पश्चिम, मुंबई-उत्तर पूर्व, उत्तर मुंबई, उत्तर मध्य, दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य. अशा शहरांमध्ये सामने होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2017 01:21 PM IST

ताज्या बातम्या