'त्या' चुकीने अर्जुन तेंडुलकरचा संघ पराभूत, सचिनही भडकला!

'त्या' चुकीने अर्जुन तेंडुलकरचा संघ पराभूत, सचिनही भडकला!

आतापर्यंत क्रिकेटमध्ये असं कधीही घडलं नाही, जे काही पाहिलं ते पहिल्यांदाच होतं असं सचिन म्हणाला.

  • Share this:

मुंबई, 27 मे : IPLप्रमाणेच मुंबई टी20 लीग मध्येही वाद निर्माण झाला. शनिवारी खेळण्यात आलेल्या आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब सामन्यात गोलंदाजी करणाऱ्या संघाला झाला तसाच दंड फलंदाजी करणाऱ्या संघाला करायला हवा असं मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केलं.

सोबो सुपरसोनिक्सच्या संघाने 15 षटकांपर्यंत बिनबाद 158 धावा झाल्या होत्या. त्यावेळी फलंदाज हर्श टँकला स्नायुत वेदना जाणवल्याने डॉक्टरांची मदत घ्यावी लागली होती. त्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जय बिश्टाने एक धाव घेतली. पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पुन्हा बिश्टा स्ट्राइकला न येता टँक खेळत होता. ही गोष्ट मैदानावरील खेळाडू आणि पंचांच्याही लक्षात आली नाही.

टँक पहिल्याच चेंडूवर बाद झाला तेव्हा पंचांना फलंदाजांनी स्ट्राइक बदलला नसल्याचं लक्षात आलं. त्यावेळी डेड बॉल दिल्याने आकाश टायगर्सला विकेट मिळाली नाही. खरंतर स्ट्राइक न बदलणं ही फलंदाजांची चूक होती.

मैदानावर स्ट्राइकचा गोंधळ झाला त्यावेळी टँक 79 धावांवर खेळत होता. त्यानंतर त्याने 14 धावांची भर घातली. या सामन्यात सोबो सुपरसोनिक्सने 26 धावांनी सामना जिंकला.

स्ट्राइकच्या या गोंधळाबद्दल सचिन म्हणाला, जे काही मी पाहिलं ते पहिल्यांदाच होतं. त्यावर काय करता येईल हा विचार केला. हा डेड बॉल असू शकत नाही. पण नियमानुसार त्यावेळी जे झालं ते योग्य होतं.

नियमानुसार निर्णय दिला असला तरी यात भविष्याच्या दृष्टीने बदल करता येतो. फलंदाजांनी स्ट्राइक बदलला नाही यासाठी फलंदाजी करणाऱ्या संघाला दंड का केला जात नाही? फलंदाजी करणाऱ्या संघालाही दंड केला पाहिजे. एका चेंडूवर कमाल 7 धावा निघू शकतात. यात एक नो बॉल आणि फ्री हिट. यासाठी फलंदाजी करणाऱ्या संघाला 7 धावांचा दंड केला पाहिजे.

धूर निघाला आणि लोकल ट्रॅकवर घसरली, मध्य रेल्वे विस्कळीत VIDEO

First published: May 27, 2019, 8:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading