Home /News /sport /

'माझी बॅट कशी उचलणार?' सूर्यकुमार यादवचा टीम इंडियाच्या खेळाडूला प्रश्न, VIDEO

'माझी बॅट कशी उचलणार?' सूर्यकुमार यादवचा टीम इंडियाच्या खेळाडूला प्रश्न, VIDEO

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सूर्याचा हा व्हिडीओ शेअर केला असून त्यात त्याने टीम इंडियाच्या खेळाडूबद्दल धमाल प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई, 26 मे: टीम इंडिया (Team India) आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) बॅट्समन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या मुंबईत घरी आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु असल्याने तो घराच्या बाहेर जाऊ शकत नाही. या काळात तो सोशल मीडियावर (Social Media) सक्रीय आहे. त्याने काही दिवसांपूर्वी विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीबद्दल फॅन्सनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले होते. त्यानंतर श्रेयस अय्यरच्या व्हिडीओ पाहून 'ही' शहेनशाची चाल आहे, अशी कमेंट केली  आहे.  सूर्यकुमारने एका नव्या व्हिडीओत टीम इंडियाच्या खेळाडूबद्दल मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यावेळी सूर्यकुमारशी सुरु असलेल्या गप्पांमध्ये टीम इंडियाचा बॉलर युजवेंद्र चहलचा (Yuzvendra Chahal) विषय निघाला. 'चहल तुला नेहमी बॅट मागत असतो तू चहलची बॅट घेतली आहेस का?' असा प्रश्न सूर्याला अँकरने विचारला होता. त्यावर सूर्यकुमारने सांगितले की, " तो मला बॅट मागत असतो.पण, माझी बॅट वजनाने जास्त आहे. मी त्याला अनेदा म्हंटलं आहे की, तू इतका बारीक आहेस, माझ्या बॅटनेने कशी उचलशील?  पण आता तो मला पुन्हा भेटेल त्यावेळी मी त्याला बॅट देणार आहे.'' असे सूर्याने हसत-हसत सांगितले. श्रीलंका दौऱ्यात होणार दोघांची भेट टीम इंडिया जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये सूर्यकुमार यादवची निवड निश्चित आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानं सूर्यकुमारची इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेत निवड झाली होती. सूर्याने पहिल्याच इनिंगमध्ये अर्धशतक झळकावत, दमदार सुरुवात केली. स्मृती मंधाना आणि जेमिमाला आव्हान देण्यासाठी चिमुरडी सज्ज, पाहा VIDEO सूर्याप्रमाणेच युजवेंद्र चहलची देखील श्रीलंका दौऱ्यासाठी निवड पक्की आहे. त्यामुळे आता या दोघांची श्रीलंका दौऱ्यात भेट होणार असून त्यावेळी चहलची सूर्याच्या बॅटने खेळण्याची इच्छा पूर्ण होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Mumbai Indians, Suryakumar yadav, Yuzvendra Chahal

    पुढील बातम्या