मुंबई, 10 मे: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) फास्ट बॉलर चेतन सकारिया (Chetan Sakariya) यांच्या वडिलांचं रविवारी कोरोनामुळे निधन झालं. त्यापाठोपाठ आणखी एका खेळाडूवर कोरोनामुळेच दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) अनुभवी स्पिनर पीयूष चावला (Piyush Chawala) याच्या वडिलांचं कोरोनानं निधन झालं आहे. (Piyush Chawla father passed away due to covid 19) मुंबई इंडियन्सनं ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.
पीयूष चावलाला या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सनं कराराबद्ध केलं आहे. तो यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडून देखील खेळला आहे. 2014 साली आयपीएल जिंकणाऱ्या कोलकाताच्या टीमचा चावला सदस्य होता. मागील सिझननंतर चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) त्याला करारमुक्त केलं होतं. त्यानं 13 व्या सिझनमधील 7 मॅचमध्ये 6 विकेट्स घेतल्या होत्या. चावलाला यावर्षी झालेल्या लिलावात (IPL 2021 Auction) मुंबई इंडियन्सनं 2.4 कोटींमध्ये खरेदी केलं होतं. मात्र त्याला अजून मुंबईकडून एकही आयपीएल मॅच खेळण्याची संधी मिळालेली नाही.
मुंबई इंडियन्सनं चावलांच्या वडिलांच्या निधानाची माहिती देणाऱ्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, " या कठीण प्रसंगात आम्ही तुझ्या आणि तुझ्या कुटुंबासोबत आहोत. तू धीर सोडू नकोस." चावलानंही इन्स्टाग्रामवर वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. " तुमच्या शिवाय आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नाही. आज मी माझी शक्ती गमावली आहे." अशी भावना त्यानं व्यक्त केली आहे.
Our thoughts go out to Piyush Chawla who lost his father, Mr. Pramod Kumar Chawla this morning.
We are with you and your family in this difficult time. Stay strong. pic.twitter.com/81BJBfkzyv — Mumbai Indians (@mipaltan) May 10, 2021
अमेरिकेत क्रिकेट खेळण्याच्या दाव्यावर भारताच्या माजी कॅप्टनचं स्पष्टीकरण, म्हणाला...
राजस्थान रॉयल्चा (Rajasthan Royals) फास्ट बॉलर चेतन सकारिया (Chetan Sakariya) याच्या वडिलांचे कोरोनामुळे रविवारी निधन झालं. त्यांच्यावर गुजरातमधील भावमगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. वडिलांच्या उपचारासाठी आयपीएलची सर्व कमाई देण्याची सकारियाची तयारी होती. दुर्दैवानं त्याचे हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, IPL 2021, Mumbai Indians