टीम इंडियाच्या निवड समितीत जाण्यासाठी मुंबईचा आणखी एक खेळाडू रेसमध्ये!

टीम इंडिया (Team India) च्या निवड समितीमध्ये जाण्यासाठीची स्पर्धा आता आणखी चुरशीची झाली आहे. निवड समितीच्या तीन पदांपैकी एक पद भरण्यासाठी मुंबईचा माजी फास्ट बॉलर एबी कुरुविला (Abey Kuruvilla) याने अर्ज केला आहे. एबी कुरुविला याला भारताचा आणि मुंबईचाच माजी फास्ट बॉलर अजित आगरकर (Ajit Agarkar) याचं आव्हान असणार आहे.

टीम इंडिया (Team India) च्या निवड समितीमध्ये जाण्यासाठीची स्पर्धा आता आणखी चुरशीची झाली आहे. निवड समितीच्या तीन पदांपैकी एक पद भरण्यासाठी मुंबईचा माजी फास्ट बॉलर एबी कुरुविला (Abey Kuruvilla) याने अर्ज केला आहे. एबी कुरुविला याला भारताचा आणि मुंबईचाच माजी फास्ट बॉलर अजित आगरकर (Ajit Agarkar) याचं आव्हान असणार आहे.

  • Share this:
    मुंबई, 19 नोव्हेंबर : टीम इंडिया (Team India) च्या निवड समितीमध्ये जाण्यासाठीची स्पर्धा आता आणखी चुरशीची झाली आहे. निवड समितीच्या तीन पदांपैकी एक पद भरण्यासाठी मुंबईचा माजी फास्ट बॉलर एबी कुरुविला (Abey Kuruvilla) याने अर्ज केला आहे. सरनदीप सिंग (उत्तर विभाग), देवांग गांधी (पूर्व विभाग) आणि जतिन परांजपे (पश्चिम विभाग) यांचा कार्यकाळ संपल्यामुळे निवड समितीमधली तीन पदं रिक्त झाली आहेत. भारताकडून 10 टेस्ट आणि 25 वनडे खेळणाऱ्या कुरुविलाने शेवटचे दोन दिवस बाकी असताना 13 नोव्हेंबरला अर्ज केला. कुरुविलाने टेस्ट आणि वनडेमध्ये प्रत्येकी 25-25 विकेट घेतल्या आहेत. एबी कुरुविला 2008-12 या कालावधीमध्ये ज्युनियर निवड समितीमध्येही होता. भारताने 2012 साली अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला तेव्हा कुरुविला निवड समितीचा अध्यक्ष होता. नवी मुंबईत राहणाऱ्या 53 वर्षांच्या एबी कुरुविला याला भारताचा आणि मुंबईचाच माजी फास्ट बॉलर अजित आगरकर (Ajit Agarkar) याचं आव्हान असणार आहे. अजित आगरकर या पदासाठीचा प्रबळ दावेदार आहे. आगरकरची या पदासाठी जर निवड झाली तर तो थेट निवड समितीचा अध्यक्ष बनेल. बीसीसीआयच्या नियमांनुसार निवड समितीमध्ये ज्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव जास्त असतो, त्याला निवड समिती अध्यक्षाची जबाबदारी मिळते, त्यामुळे आगरकर जर अध्यक्ष झाला, तर सध्याचे अध्यक्ष सुनिल जोशी हे फक्त निवड समिती सदस्य राहतील. अजित आगरकर याआधी मुंबईचाही निवड समिती अध्यक्ष होता. भारताचे माजी क्रिकेटपटू मदनलाल यांच्या नेतृत्वात क्रिकेट सल्लागार समिती निवड समितीच्या तीन सदस्यांची निवड करतील. क्रिकेट सल्लागार समितीमध्ये मदनलाल यांच्यासोबत आरपी सिंग आणि सुलक्षणा नाईक असणार आहेत. याच समितीने मार्च महिन्यामध्ये सुनिल जोशी (दक्षिण विभाग) आणि हरविंदर सिंग (मध्य विभाग) यांची निवड केली होती.
    Published by:Shreyas
    First published: