मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

मुंबईच्या क्रिकेटपटूंना लॉटरी, दिवाळी जाणार आनंदात!

मुंबईच्या क्रिकेटपटूंना लॉटरी, दिवाळी जाणार आनंदात!

कोरोनाच्या या काळात दिवाळी (Diwali) मध्ये मुंबईच्या क्रिकेटपटूंना लॉटरी लागली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ने क्रिकेटपटूंना 2016-17 आणि 2017-18 या मोसमाची थकबाकी असलेली स्पॉन्सरशीपची रक्कम दिली आहे.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 14 नोव्हेंबर : कोरोनाच्या या काळात दिवाळी (Diwali) मध्ये मुंबईच्या क्रिकेटपटूंना लॉटरी लागली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ने क्रिकेटपटूंना 2016-17 आणि 2017-18 या मोसमाची थकबाकी असलेली स्पॉन्सरशीपची रक्कम दिली आहे. ही रक्कम 45 लाख रुपये प्रती मोसम म्हणजेच एकूण 90 लाख रुपये आहे. हे पैसे मुंबईचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या 137 खेळाडूंमध्ये वाटण्यात आले आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने पहिल्यांदाच यामध्ये महिला टीम आणि अंडर-23 टीमचाही समावेश केला आहे. मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार 2016-17 साली मुंबईचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या 70 आणि 2017-18 सालच्या 67 खेळाडूंना याचा फायदा झाला आहे. या यादीमध्ये रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, मुंबई अंडर-23 टीम, वरिष्ठ महिला टीममध्ये खेळणाऱ्या मुंबईच्या खेळाडूंचा समावेश आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून भारतात क्रिकेट स्पर्धा झालेल्या नाहीत. त्यामुळे पूर्णपणे क्रिकेटवर अवलंबून असणाऱ्या खेळाडूंना आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच दिवाळीमध्ये एमसीएने दिलेल्या या रकमेमुळे खेळाडूंची आणि त्यांच्या घरच्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे. 2016-17 च्या मोसमात 23 खेळाडूंनी मुंबईच्या वरिष्ठ टीमचं प्रतिनिधीत्व केलं होतं. आदित्य तरेच्या नेतृत्वात खेळलेली मुंबईची टीम उपविजेती ठरली होती. रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मुंबईला इंदूरमध्ये गुजरातने 5 विकेटने मात दिली होती. यानंतर पुढच्या मोसमात 21 खेळाडू मुंबईकडून खेळले होते. नागपूरमध्ये झालेल्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबईचा 20 रनने पराभव झाला होता.
First published:

पुढील बातम्या