मुंबई, 13 सप्टेंबर : टी 20 वर्ल्ड कपसाठी महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) टीम इंडियाचा मेंटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टीम इंडियाचे कोच रवी शास्त्रींचा (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ टी20 वर्ल्ड कपनंतर संपत आहे. त्यापार्श्वभूमीवर धोनीच्या नियुक्तीनंतर चर्चांना सुरुवात झाली होती. धोनी टी20 वर्ल्ड कपनंतर टीमसोबत राहणार की नाही? याचं उत्तर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी दिलं आहे.
'टेलिग्राफ'च्या वृत्तानुसार धोनीची नियुक्ती ही भारतीय टीमच्या मदतीसाठी करण्यात आली आहे. टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. आम्ही बराच विचार करुन हा निर्णय घेतलाय. 2013 नंतर एकही आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात भारतीय टीम यशस्वी झालेली नाही. मोठ्या स्पर्धांसाठी नेहमीच सिनिअर खेळाडूंची मदत घेतली जाते. मागील अॅशेस सीरिजमध्ये स्टीव्ह वॉला या प्रकारची जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हा सीरिज 2-2 नं बरोबरीत सुटली.' असं गांगुलीनं सांगितलं.
धोनी भविष्यातही टीम इंडियासोबत असेल का? या प्रश्नाचं उत्तर देताना गांगुलीनं सांगितलं की, 'त्याची नियुक्ती फक्त टी20 वर्ल्ड कपसाठी करण्यात आलेली आहे. त्यालाही याबाबतची कल्पना देण्यात आली आहे. रवी शास्त्री आता कदाचित पूर्ण वेळ कोच म्हणून काम करण्यास तयार नाहीत. आम्ही त्यांच्याशी या विषयावर अद्याप चर्चा केलेली नाही. ते भारतामध्ये येतील तेव्हा या विषयावर चर्चा होईल,' असं गांगुली यांनी स्पष्ट केले.
IND vs ENG: ...म्हणून मँचेस्टर टेस्ट रद्द झाली! सौरव गांगुलीचा खुलासा
2007 साली धोनीच्याच नेतृत्वात भारताने पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. याचसह 2011 वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीही भारताने धोनीच्याच नेतृत्वात जिंकली. यानंतर मात्र भारताला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. आता पुन्हा एकदा धोनीची टीममध्ये एण्ट्री झाल्यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.