एमएस धोनी जेवढा त्याच्या फलंदाजीसाठी आणि यष्टीरक्षणासाठी ओळखला जातो, तेवढाच तो त्याच्या विनोदबुद्धीसाठीही ओळखला जातो. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा आणि शेवटचा सामना जिंकवून दिल्यामुळे तो जरा खूशच होता. त्याला मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला.
पुरस्कार घ्यायला जाण्याआधी त्याच्या हातात सामन्याचा चेंडू होता. आपल्या संघातील इतर साथीदारांना भेटताना त्याच्या हातात बॉल होताच. या दरम्यान जेव्हा तो फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांच्या जवळ आला. तेव्हा धोनी त्यांच्याकडे पाहून म्हणाला की, ‘हा बॉल पकडा. नाही तर तुम्ही म्हणाल मी निवृत्ती घेतोय.’
विशेष म्हणजे, याआधीच्या दौऱ्यात धोनीने पंचांकडून चेंडू मागून घेतला होता. यामुळे धोनी निवृत्ती घेतोय की काय असाच प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. मात्र प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं.
See #Dhoni when gave ball to the coach and said " Ball lelo nahi to bolega retirement lerahe ho"
— Lakshay Rohilla (@lakshayrohilla3) January 18, 2019
even even #Dhoni wants to play more. #AUSvIND #INDvAUS #Chahal #Jadhav #WhistlePodu@ChennaiIPL pic.twitter.com/B5dMVQEzhR
आतापर्यंत धोनी सहाव्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरायचा. मात्र काही सामन्यांपासून तो चौथ्या स्थानावर फलंदाजी करायला येत आहे. त्याने तिसऱ्या सामन्यात ११४ चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने ८७ धावा केल्या.
धोनीला कोणत्या स्थानावर फलंदाजी करायला आवडते असा प्रश्न विचारला असता त्याने ‘मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करायला तयार असतो. संघाला माझी गरज कुठे आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे.’
सामन्यानंतर तो म्हणाला की, ‘मी चौथ्या क्रमांकावर खेळू किंवा सहाव्या क्रमांकावर. संघासाठी काय महत्त्वाचं आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. १४ वर्ष खेळल्यानंतर मी सहाव्या क्रमांकावर खेळू शकत नाही असं मी बोलूच शकत नाही.’