Home /News /sport /

IPL मधून बाहेर पडताच झारखंडच्या निवडणुकीत ड्यूटी करू लागला धोनी! वाचा, Viral Photo चे सत्य

IPL मधून बाहेर पडताच झारखंडच्या निवडणुकीत ड्यूटी करू लागला धोनी! वाचा, Viral Photo चे सत्य

आयपीएल 2022 मधून बाहेर पडताच महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) झारखंडमधील पंचायत निवडणुकीत निवडणूक कर्मचारी म्हणून काम केल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

    मुंबई, 27 मे : महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) कॅप्टन असलेल्या चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) हा आयपीएल सिझन (IPL 2022) खास ठरला नाही. सीएसकेनं 14 पैकी फक्त 4 सामने जिंकले. त्यामुळे गतविजेत्यांचं यंदा साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं. सीएसकेची पॉईंट टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर घसरण झाली. आयपीएल स्पर्धेतील सीएसकेचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून त्यामध्ये धोनीसारखा एक व्यक्ती झारखंडमधील पंचायत निवडणुकीत ड्यूटी करत आहे. व्हायरल फोटोतील व्यक्तीचा चेहरा हा धोनीशी जुळणारा आहे. त्यामुळे अनेक जण त्याच्याबरोबर धोनी समजून सेल्फी देखील घेत आहेत.'आजतक' नं दिलेल्या वृत्तानुसार या व्यक्तीचे नाव विवेक कुमार आहे. ते सीसीएलमध्ये सहाय्यक प्रबंधक आहेत. झारखंड पंचायत निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ते ड्यूटीवर होते. त्यांना एका बाजूनं पाहिलं तर ते अगदी महेंद्रसिंह धोनीसारखे दिसतात. धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2020 साली निवृत्ती घेतली आहे. तो आता फक्त आयपीएलमध्ये खेळतो. आयपीएलमधील चेन्नईच्या शेवटच्या मॅचमध्ये धोनीला तो पुढील वर्षी खेळणार का? हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी धोनीनं पुढच्यावर्षी देखील खेळणार असल्याचं जाहीर केलं आहे. 'चेन्नईमध्ये न खेळता निरोप घेणे, चुकीचे ठरेल. मुंबईमध्ये मला खेळाडू म्हणून तसंच टीम म्हणून खूप प्रेम आणि आपुलकी मिळती. पण, तो सीएसकेच्या फॅन्सशी अन्याय असेल. पुढच्या वर्षी टीमना वेगवेगळ्या जागी खेळण्याची संधी मिळेल अश आशा आहे. त्यामुळे त्या सर्व ठिकाणी जाऊन आभार मानता येतील. मी पुढच्या वर्षी दमदार पुनरागमनासाठी कठोर परिश्रम करणार आहे.' असं धोनीनं सांगितलं. 6,6,6,6,6,4 : IPL लिलावातील अनसोल्ड खेळाडूनं एकाच ओव्हरमध्ये काढले 34 रन, पाहा VIDEO धोनीच्या कॅप्टनसीमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं 4 वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलं आहे. तो चेन्नईचा सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. धोनीनं या सिझनच्या सुरूवातील रविंद्र जडेजाकडं (Ravindra Jadeja) कर्णधारपद सोपवलं होतं. पण टीमच्या खराब कामगिरीमुळे तो पुन्हा एकदा कर्णधार बनला. आता पुढील सिझनमध्येही धोनीनं चेन्नईचा कर्णधार असेल की नाही? याबाबत त्यानं कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ipl 2022, Jharkhand, MS Dhoni

    पुढील बातम्या