VIDEO : धोनी म्हणतो, मै पल दो पल का शायर... माझ्यापेक्षा चांगलं खेळणारा कोणीतरी येईल

VIDEO : धोनी म्हणतो, मै पल दो पल का शायर... माझ्यापेक्षा चांगलं खेळणारा कोणीतरी येईल

भारताच्या लष्करात काश्मीरमध्ये धोनी सध्या ट्रेनिंग घेत असून त्यानं ट्रेनिंगवेळी एका कार्यक्रमात मै पल दो पल का शायर हे गाणं म्हटलं. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • Share this:

श्रीनगर, 07 ऑगस्ट : वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातून भाराताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीनं माघार घेतली. त्यानंतर धोनी भारतीय लष्करात ट्रेनिंग घेत आहे. सध्या जम्मू काश्मीरच्या विक्टर फोर्समध्ये त्याचं ट्रेनिंग आहे. यातील काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. धोनी विंडीज दौऱ्यावर जाणार नाही तर तो निवृत्ती घेईल असं म्हटलं जात होतं. मात्र, बीसीसीआयनंच निवृत्तीचे संकेत फेटाळून लावत अजुनही संघाला गरज असल्याचं म्हटलं होतं. आता रेजिमेंटमध्ये ट्रेनिंगदरम्यान धोनीने गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये धोनी म्हणतो की, भविष्यात मी कोणाच्या आठवणीत राहिल किंवा नाही सांगता येत नाही. पुढे माझ्यापेक्षा चांगलं खेळणारं कोणीतरी येईल. असं म्हणत धोनीने 'मै पल दो पल का शायर...' हे गाणं गायलं.

धोनीनं 31 जुलैला लष्कराच्या ट्रेनिंगमध्ये सहभागी झाला. 15 ऑगस्टपर्यंत तो बटालियनमध्ये असणार आहे. धोनीने ट्रेनिंग कँपमध्ये पाच पॅराशूट जंम्प मारल्या असून तो पॅराट्रूपर झाला आहे. आता ट्रेनिंगमध्ये त्याच्यावर पेट्रोलिंग, गार्ड तसेच पोस्ट ड्यूटीची जबाबदारी असणार आहे.

धोनी लष्करात ट्रेनिंग घेत असला तरी त्याची अजून संघाला गरज आहे असे बीसीसीआयच्या निवड समितीनं म्हटलं आहे. निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले होते की, सध्या संघाची निवड आगामी टी20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने करण्यात आली आहे. यापुढे यष्टीरक्षणाची जबाबदारी पंतच्या खांद्यावर असेल. त्याला मार्गदर्शन करण्यासाठी धोनीची गरज असणार आहे. त्यामुळं धोनी किमान पुढच्या टी20 वर्ल्ड कपपर्यंत संघात असेल.

========================================================

First published: August 7, 2019, 10:48 AM IST
Tags: MS Dhoni

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading