धोनीचा कूल सल्ला, ब्राव्होने चौकार मारुन मिळवला विजय

धोनीचा कूल सल्ला, ब्राव्होने चौकार मारुन मिळवला विजय

शेवटच्या षटकात विजयासाठी 2 धावा हव्या असताना चेन्नईने फक्त दोन चेंडू राखून विजय मिळवला.

  • Share this:

दिल्ली, 27 मार्च : आयपीएलच्या गतविजेत्या चेन्नईने पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करत यंदाच्या आयपीएलमध्ये सलग दुसरा विजय मिळवला. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सीएसकेने दिल्ली कॅपिटल्सला 6 विकेटने नमवले. चेन्नईकडून वॉटसनने 26 चेंडूत 44, रैनाने 16 चेंडूत 30 धावांची खेळी केली. तर धोनी आणि जाधवने अनुक्रमे 32 आणि 27 धावा केल्या.

दिल्लीविरुद्धचा सामना चेन्नई सहज जिंकेल असं वाटत होतं. शेवटच्या षटकात चेन्नईला फक्त 2 धावांची गरज होती. दिल्लीचा रबाडा गोलंदाजीला होता. त्याने पहिल्याच चेंडूवर केदार जाधवला बाद केले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ड्वेन ब्राव्होला पुढच्या सलग 2 चेंडूंवर एकही धाव काढता आली नाही. त्यावेळी धोनीने ब्राव्होला दबावाखाली न खेळता आरामात खेळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ब्राव्होने चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. या विजयाने चेन्नई गुणतक्त्यात पहिल्या स्थानी पोहचली आहे.

दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या सामन्यात कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीने चेन्नईला 148 धावांचे लक्ष्य दिले होते. दिल्लीकडून शिखर धवनने 45 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. तर चेन्नईच्या ब्राव्होने टिच्चून गोलंदाजी करताना 3 विकेट घेतल्या.

सहा भाषेत बोलते धोनीची लेक; पाहा बाप-लेकीचा 'हा' VIDEO

First published: March 27, 2019, 7:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading