कॅप्टन कूलचा कठोर निर्णय, त्यानंतर कोणीच सरावाला उशीर नाही केला

कॅप्टन कूलचा कठोर निर्णय, त्यानंतर कोणीच सरावाला उशीर नाही केला

भारतीय संघातील खेळाडू आणि इतर सदस्य बैठकीला आणि सरावाला उशिरा यायचे यावर कर्णधार असताना धोनीने एक उपाय सांगितला.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 मे : भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक पॅडी अॅप्टन यांनी द बेअरफूट कोच या पुस्तकात अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी गौतम गंभी आणि एस श्रीसंतवर मोठे आरोप केले आहेत. यात त्यांनी धोनीबद्दल काही किस्से सांगितले आहेत. यातून भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कॅप्टन कूल धोनीकडे एखाद्या समस्येवर कसा उपाय शोधायचा याचे कौशल्य असल्याचं दिसतं.

पॅडी अॅप्टन यांनी म्हटलं आहे की, मी प्रशिक्षक असताना अनिल कुंबळे कसोटी कर्णधार तर धोनी एकदिवसीय संघाचा कर्णधार होता. त्यावेळी संघात शिस्त रहावी यासाठी प्रयत्न सुरु होते. खेळाडू संघाच्या बैठकीला, सरावाला वेळेवर पोहचावेत असं वाटत होते. यासाठी आम्ही संघातील खेळाडू आणि इतर सदस्यांना वेळेवर येण्याचं महत्त्व सांगितलं. याबद्दल सर्वांनी हो म्हटलं पण यानंतर दोन्ही कर्णधारांचे म्हणणे विचारण्यात आले.

कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळलेल्या अनिल कुंबळेने संघाच्या नेहमीच्या बैठकीला, सरावाला उपस्थित न राहणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड द्यावा लागेल असं सांगितलं. त्यावर धोनीनेही आपण कुंबळेच्या म्हणण्याशी सहमत असल्याचं म्हटलं. मात्र, यासाठी आणखी एक अट ठेवण्यात आली. त्यानुसार कोणताही खेळाडू उशिरा आला तर संपूर्ण संघाला 10-10 हजार रुपये दंड द्यावा लागेल. त्यानंतर कोणताही खेळाडू उशिरा आला नाही असं अॅप्टन यांनी म्हटलं आहे.

कॅप्टन कूलचं कौतुक करताना अॅप्टन यांनी म्हटलं आहे की, धोनीची खरी ताकद त्याचा शांत स्वभाव आहे. तो खूप चांगला कर्णधार असून कठीण प्रसंगातदेखील इतर खेळाडूंनाही तो शांत ठेवतो. यामुळेच तो महान ठरतो.

वाचा : दोन धावा का घेता आल्या नाही, शार्दुलने केला चेन्नईच्या पराभवाचा खुलासा

VIDEO: जनता होरपळतेय दुष्काळात, मंत्री सदाभाऊ खोत ACच्या गार वाऱ्यात!

First published: May 15, 2019, 4:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading