Home /News /sport /

धोनी करणार असलेला 'कडकनाथ'चा व्यवसाय नेमका काय आहे?

धोनी करणार असलेला 'कडकनाथ'चा व्यवसाय नेमका काय आहे?

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर धोनी आता कडकनाथ (Kadaknath) कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू करणार आहे.

    मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर धोनी आता कडकनाथ (Kadaknath) कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू करणार आहे. यासाठी धोनीने 2 हजार कडकनाथ कोंबडीच्या पिल्लांची ऑर्डरही दिली आहे. कडकनाथ कोंबडीचं मांस सगळ्यात महाग विकलं जातं, सोबतच याचं अंडही सर्वात महाग असतं. धोनीने याआधी शेती आणि डेयरीचा व्यवसायही सुरू केला आहे. तज्ज्ञांच्या मते कडकनाथ कोंबडीचं अंड सामान्य कोंबडीच्या अंड्यापेक्षा जास्त आरोग्यदायी असते. तसंच कडकनाथच्या अंड्यात प्रोटीनही जास्त असल्याचा दावा केला जातो. कोलेस्ट्रॉल कमी असल्यामुळे हार्ट पेशंटही हे अंड खाऊ शकतात, असंही सांगितलं जातं. हकीम आणि वैद्यदेखील कडकनाथ कोंबडीच्या अंड्याचे आणि त्याच्या मांसाचे औषधी गूण सांगतात. कडकनाथ कोंबडीमध्ये फॅट कमी असल्यामुळे हृदय विकार आणि डायबिटीसच्या रुग्णांसाठी कडकनाथचं मांस जास्त फायदेशीर असल्याचं समजलं जातं (न्यूज 18 असा कोणताही दावा करत नाही), त्यामुळे कडकनाथची मागणी देशभरात वाढली आहे. 400-500 रुपयांना एक पिल्लू कडकनाथ प्रजातीचं अंड देणारी कोंबडी सध्या बाजारात 3-4 हजार रुपयांना विकत मिळते. या कोंबडीचं पिल्लू 6-7 महिन्यांनी अंडे देण्याच्या योग्य होते. कडकनाथ कोंबडीचं पिल्लू 400-500 रुपयांना मिळतं. राजस्थानच्या कोट्यामध्ये कडकनाथ कोंबडी आणि त्याच्या अंड्याचा व्यापार करणारे हफीज भाई सांगतात, 'कडकनाथची मागणी जास्त आणि उत्पन्न कमी असल्यामुळे याच्या अंड आणि मांसाची किंमत ठरलेली नसते. ज्याला जसे ग्राहक मिळतात, तसा व्यापार केला जातो.' कसा करायचा व्यवसाय? कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय करायचा असेल, तर 100 कोंबड्या ठेवण्यासाठी 150 वर्ग फुटाची जागा लागते. तसंच तुम्हाला एक हजार कोंबडे ठेवायचे असतील, तर 1,500 वर्ग फुटांच्या जागेची गरज पडते. तसंच पोल्ट्री शहर किंवा गावापासून बाहेर, मुख्य रस्त्यापासून लांब असलं पाहिजे. पाणी आणि वीजेचा मुबलक पुरवठा असला पाहिजे. तसंच पोल्ट्री फार्म उंचावर असेल, तर आणखी चांगलं, त्यामुळे पाणी साठणार नाही. काय काळजी घेतली जाते? कडकनाथच्या पिल्लांना आणि कोंबड्यांना अंधारात आणि रात्री खाणं दिलं जाऊ नये. कोंबडीच्या शेडमध्ये रोज काही तास प्रकाश येणं आवश्यक असतं. तसंच दोन पोल्ट्री फार्म एकमेकांजवळ असता कामा नये. एका शेडमध्ये कायम एकाच जातीची पिल्लं ठेवली गेली पाहिजेत. कोंबड्यांच्या पाणी पिण्याची भांडी दोन ते तीन दिवसांमध्ये स्वच्छ करणं गरजेचं आहे. तसंच पोल्ट्री फार्ममध्ये हवा आणि प्रकाशही पुरेसा असला पाहिजे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या